PAN कार्ड ‘हरवलंय’, ‘तुटलंय’ तर ‘नो-टेन्शन’, ‘इथं’ ऑनलाइन अर्ज करून मिळवा तात्काळ, जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – आजच्या काळात पॅनकार्ड फार महत्वाचा पुरावा झाला आहे. ओळखपत्राच्या रूपामध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता. पॅनकार्ड तुम्ही तुमच्याजवळ सहज बाळगू शकता. मात्र जर तुमचे पॅनकार्ड हरवले, तुटले किंवा तुम्हाला दुसरी प्रत हवी असल्यास चिंता करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही ऑनलाईन रीप्रिंट ऑर्डर करू शकता.

आयकर विभाग UTITSL आणि NSDL-TIN च्या मार्फत पॅनकार्ड जारी करत असते. यामधील ज्या एजन्सीने तुम्हाला पॅनकार्ड दिले असेल त्या एजन्सीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन रीप्रिंट ऑर्डर करू शकता.

या पद्धतीने करा ऑर्डर
यासाठी तुम्हाला UTITSL किंवा NSDL-TIN च्या ऑनलाइन पोर्टलवर जावे लागेल. त्याठिकाणी तुम्हाला “Reprint PAN Card” असा पर्याय दिसून येईल. त्यावर तुम्हाला पॅनकार्डची दुसरी कॉपी मागण्यासाठी मागणी करता येणार आहे.

50 रुपयात होईल काम
पॅनकार्डच्या दुसऱ्या प्रतीचे डिलिव्हरी शुल्क हे दोन्ही एजन्सीचे समान आहेत. भारतात तुम्हाला कुठेही पॅनकार्ड मागवायचे असेल तर तुम्हाला यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. मात्र जर तुम्हाला देशाच्या बाहेर पॅनकार्ड हवे असेल तर तुम्हाला यासाठी 959 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र यासाठी तुम्ही दिलेला पत्ता योग्य आहे कि नाही याची तुम्हाला खात्री करावी लागणार आहे. नवीन प्रत मागविण्यासाठी तुम्हाला केवळ तुमचा पॅनकार्ड नंबर आई जन्मतारीख सांगावी लागणार आहे.

Visit : Policenama.com