जर तुम्हाला असेल EPF Account शी संबंधीत काही समस्या तर ‘इथं’ नोंदवा तक्रार, जाणून घ्या प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला ईपीएफ काढणे, केवायसी ट्रान्सफर इत्यादीशी संबंधीत काही समस्या असतील, तर तुम्ही तुमची तक्रार ईपीएफओपर्यंत पोहचवू शकता. इपीएफओने यासाठी वेगळी ईपीएफ तक्रार व्यवस्थापन प्रणाली वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटवर जाऊन कोणीही ईपीएफओ सदस्य इपीएफ अकऊंटसंबंधी आपली तक्रार नोंदवू शकतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) चे सुमारे सहा करोड सदस्य आहेत. ईपीएफ अकाऊंटशी संबंधीत तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया कशी आहे ते जाणून घेवूयात.
स्टेप 1.
सर्वात अगोदर तुम्हाला www.epfigms.gov.in वेबसाइटवर जावे लागेल आणि तक्रार नोंदवण्यासाठी ‘Register Grievance’ वर क्लिक करावे लागेल.
स्टेप 2.
आता एक नवे पेज उघडेल. आता तुम्हाला पीएफ मेंबर, ईपीएफ पेन्शनर, एम्प्लॉयर इत्यादी मध्ये ते स्टेटस निवडावे लागेल, ज्यामध्ये तक्रार नोंदवायची आहे.
स्टेप 3.
जर तुम्हाला पीएफ अकाऊंटशी संबंधीत तक्रार करायची आहे, तर स्टेटस म्हणून ’पीएफ मेंबर’ निवडा. आता तुम्हाला आपला यूएएन आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल.
स्टेप 4.
ही माहिती टाकल्यानंतर ’गेट डिटेल्स’ वर क्लिक करा. आता यूएएनशी लिंक्ड तुमची व्यक्तीगत माहिती स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5.
आता तुम्हाला ’गेट ओटीपी’ वर क्लिक करावे लागेल. हा ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर येईल.
स्टेप 6.
आता तुम्हाला ओटीपी टाकून सबमिटवर क्लिक करावे लागेल. ओटीपीच्या व्हेरिफिकेशननंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्ड टाकण्यासाठी सांगितले जाईल.
स्टेप 7.
पुढील स्टेपमध्ये तुम्हाला त्या पीएफ नंबरवर क्लिक करावे लागेल, जो ज्याच्या संदर्भात तक्रार करायची आहे.
स्टेप 8.
आता एक पॉप-अप येईल. येथे तुम्हाला पर्याय निवडावा लागेल, ज्याच्याशी तुमची तक्रार संबंधीत आहे. – पीएफ कार्यालय, नियोक्ता, कर्मचारी जमा लिंक्ड विमा (इडीएलआय) योजना किंवा पूर्व-पेन्शन.
स्टेप 9.
आता तुम्हाला माहिती आणि कागदपत्र अपलोड करावे लागतील. यानंतर सबमिटवर क्लिक करायचे आहे. अशाप्रकारे तुमची तक्रार नोंदवली जाईल. यानंतर तक्रारीचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मोबाइल नंबर किंवा ईमेल-आयडीवर येईल.