Aadhaar Card सोबत लिंक मोबाइल नंबर सहजपणे करू शकता ‘व्हेरिफाय’, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : आधार नंबरसोबत कोणता मोबाइल नंबर लिंक केला आहे, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आधारसंबंधी कामासाठी अनेकदा या मोबाइल नंबरची आवश्यकता भासते. यासाठी आधारशी कोणता मोबाइल नंबर लिंक आहे हे माहित असणे आवश्यक असते. हे जाणून घेण्याच्या दोन पद्धती अतिशय सोप्या स्टेप्समध्ये समजावून घेवूयात.

पहिली पद्धत
1 यासाठी सर्वप्रथम uidai.gov.in वर लॉग ऑन करा.
2 UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर My Aadhaar सेक्शनवर जा.
3 येथे Aadhaar Servicesच्या अंतर्गत Verify Email/ Mobile Number चा ऑपशन दिसेल.
4 आता Verify Email/ Mobile Number ऑपशनला क्लिक करा.
5 येथे Aadhaar No सोबत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी टाका. यानंतर कॅप्चा कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा.
6 जर तुम्ही दिलेला मोबाइल नंबर योग्य असेल तर ही प्रोसेस पुढे जाईल, अन्यथा तुम्हाला एक मॅसेज येईल, दिलेली माहिती डेटाबेसशी मॅच होत नाही.
7 अशाप्रकारे आपले सर्व जूने नंबर किंवा सध्याचे नंबर घेऊन ही माहिती मिळवू शकता. कोणता नंबर डाटाबेसशी जुळतो ते समजेल.

दुसरी पद्धत
1 यासाठी सुद्धा तुम्हाला uidai.gov.in वर लॉग ऑन करावे लागेल.
2 आता Aadhaar Services अंतर्गत Verify an Aadhaar No येईल.
3 येथे तुम्हाला आधार नंबरसोबत कॅप्चा कोड टाकून पुढे प्रोसेस करावी लागेल.
4 जर तुमचा आधार नंबर योग्य असेल तर स्क्रीनवर एक मॅसेज दिसेल, ज्यामध्ये हे लिहिलेले असेल की आधार नंबर योग्य आहे किंवा नाही. सोबतच आधार नंबरशी लिंक मोबाइल नंबरचे शेवटचे तीन आकडे दिसतील.