अर्थव्यवस्था बळकटीसाठी सरकारचं ‘मोठं’ पाऊल, सबसिडी कमी करण्यावर ‘जोर’ असणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अनेक घोषणा केेल्यानंतर आता मात्र सरकार तिजोरीवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी कठोर पावले उचलणार आहे. यासाठी सरकार सामान्यांना विविध वस्तूवर किंवा सेवावर देणारी सबसिडी कमी करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार आपला सबसिडीवर होणार खर्च कमी करण्यासाठी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपीच्या १.३% स्तरावर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.

यावरील सब्सिडी होणार कमी
सरकारी तिजोरीतील बराच मोठा खर्च खाद्य सबसिडी, खत सबसिडी आणि पेट्रोलियम पदार्थांच्या सबसिडीवर खर्च होतो. चालू आर्थिक वर्षात सरकारचा सबसिडीवरील खर्च ३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. यामुळे सरकारकडून सबसिडीसाठी ३,०१,६९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्यामुळे आता खाद्य पदार्थ, शेतीसाठी आवश्यक असलेली खते आणि सामान्यांना अत्यंत महत्वाचा असलेले पेट्रोल यावर सबसिडी कमी होणार आहे. याचा फटका मध्यम वर्गीय आणि गरीबांना बसण्याची शक्यता आहे.

सबसिडीवरील खर्च
अर्थसंकल्पानुसार सध्याची सबसिडी ही जीडीपीच्या १.४ टक्के आहे. येणाऱ्या काळात हा खर्च सरकारला कमी करायचा आहे. त्यामुळे हा खर्च कमी करुन तो १.३ % स्तरावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

विशेष म्हणजे सरकारने अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये सबसिडीवर खर्च म्हणून ३,०१,६९४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ज्यात १,८४,२२० कोटी रुपये खाद्य सबसिडी तर ७९,९९६ लाख कोटी रुपये खत सबसिडीसाठी आणि ३७,४७८ लाख कोटी रुपये पेट्रोलियम सबसिडीची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like