Mukesh Ambani | चीन आणि अमेरिका इतका श्रीमंत होईल India, जाणून घ्या मुकेश अंबानी यांनी का केले ‘हे’ वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mukesh Ambani | देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे म्हणणे आहे की, भारतात तीन दशकातील आर्थिक सुधारणांचा नागरिकांना असमान लाभ मिळाला. त्यांनी म्हटले की, समाजातील सर्वात खालच्या स्तरावर संपत्तीच्या निर्मितीसाठी विकासाचे भारतीय मॉडल आवश्यक आहे. मात्र, यासोबतच अंबानी यांनी विश्वास व्यक्त केला की 2047 पर्यंत देश अमेरिका आणि चीनच्या बरोबरीत पोहचू शकतो.

जीडीपी दहापटीने वाढला
देशात आर्थिक उदारीकरणाला 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका लेखात लिहिले आहे की, धाडसी आर्थिक सुधारणांमुळे 1991 मध्ये जे आपले सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) 266 अरब डॉलर होते, आज ते दहापट वाढले आहे. बाजार भांडवलीकरणाच्या दृष्टीने सर्वात मोठी भारतीय कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी क्वचितच अशाप्रकारचे लेख लिहिले आहेत.

मुकेश अंबानी यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे की, भारत 1991 मध्ये कमी अर्थव्यवस्थेचा देश होता, जो 2021 मध्ये सरप्लस अर्थव्यवस्थेत बदलला आहे. आता भारत स्वताला 2051 पर्यंत टिकाऊ स्तरावर सरप्लस आणि सर्वांसाठी समान समृद्धीच्या अर्थव्यवस्थेत बदलणार आहे.

अंबानी यांनी लिहिले आहे की, भारताने 1991 मध्ये अर्थव्यवस्थेची दिशा आणि निश्चय दोन्ही बदलण्याची दूरदृष्टी आणि धाडस दाखवले. सरकारने खाजगी क्षेत्राला सुद्धा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत प्रभावशाली उंचीवर ठेवले. यातून मागील चार दशकात हे स्थान केवळ सार्वजनिक क्षेत्रांना होते. यातून लायसन्स-कोटा राज समाप्त झाले, व्यापार आणि औद्योगिक धोरण उदार झाले तसेच भांडवल बाजार आणि आर्थिक क्षेत्र ‘मुक्त’ होऊ शकले.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मुकेश अंबानी यांनी म्हटले की, या सुधारणांनी भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकला. या दरम्यान लोकसंख्या 88 कोटीवरून 138 कोटी झाली, परंतु गरीबी दर अर्धा राहिला.

अंबानी यांनी म्हटले आहे की, महत्वपूर्ण पायाभूत संरचना आपल्या विचारापेक्षा कितीतरी जास्त सुधारली आहे. आता आपले एक्सप्रेसवे, विमानतळे आणि बंदरे जागतिक स्तरीय आहेत.काहीसे असेच आमच्या उद्योग आणि सेवांसोबत झाले आहे.

आता हे अविश्वसनीय वाटेल की लोकांना टेलीफोन किंवा गॅस कनेक्शनसाठी प्रतिक्षा करावी लागत होती.
किवा कंपन्यांना कम्प्युटर खरेदी करण्यासाठी सरकारची मंजूरी घ्यावी लागत होती.

त्यांनी म्हटले आहे की, 2047 मध्ये आपण आपल्या स्वातंत्र्याच्या शंभर वर्षांचा जल्लोष साजरा करू.
यापेक्षा मोठे स्वप्न काय असू शकते की,
तोपर्यंत भारताला जगातील तीन सर्वात श्रीमंत देशांपैकी एक बनवण्यात सक्षम असू. आपण अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने असू.

अंबानी यांनी पुढे म्हटले आहे की, पुढील रस्ता सोपा नाही परंतु आपण महामारी सारख्या अचानक येणार्‍या अस्थायी समस्यांना घाबरू नये.
तसेच विना महत्वाच्या मुदद्यांमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नये.
आपल्याकडे संधी आहे आणि सोबतच ही आपली जबाबदारी सुद्धा आहे की,
आपण आपली मुले आणि तरूणांसाठी पुढील 30 वर्ष स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ वर्षांमध्ये बदलू.
हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आत्मनिर्भर आणि उर्वरित जगासोबत सहकार्य करणारा भारत आवश्यक आहे.

Web Title :- top15 mukesh ambani says india in 2047 could be as rich as america and china

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस! जाणून घ्या सर्वकाही

Promotion to Assistant Public Prosecutors | राज्यातील 210 सहायक सरकारी वकिलांना बढती, पुण्यातील 22 जणांचा समावेश; गृह विभागाने काढला अध्यादेश

Sunny Leone | सली लिओनी, रतन टाटांच्या नावानं मुंबईत फिरतेय गाडी; मुंबई पोलिसांकडून 17 जणांवर FIR