PM Kisan चा 7 हप्ता तुम्हाला मिळेल किंवा नाही, सहज करू शकता चेक, जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली : सरकार पीएम किसान स्कीमचा 7वा आणि चालू आर्थिक वर्षाचा तिसरा आणि शेवटचा हप्ता पुढील महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवू शकते. जर तुम्ही सुद्धा या स्कीमअंतर्गत येत असाल किंवा यासाठी अ‍ॅप्लाय केले असेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळेल किंवा नाही हे जाणून घेणे खुप सोपे आहे. पीएम किसानच्या पोर्टलवर ही माहित मिळू शकते, तसेच आतापर्यंत नाव नोंदले नसेल तर तुम्ही तक्रार सुद्धा नोंदवू शकता.

जर तुमचे नाव या स्कीमच्या लाभार्थ्यांच्या यादीत नोंदलेले असेल तर स्कीमचा लाभ तुम्हाला मिळेल.

स्कीमच्या लाभार्थ्यांची लिस्ट कशी चेक करायची जाणून घेवूयात :

येथे ‘लाभार्थी यादी’ च्या लिंकवर क्लि करा. यानंतर आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गावाचा तपशील नोंदवा. एवढे भरल्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि संपूर्ण लिस्ट पहा.
अर्ज केल्यानंतर सुद्धा पैसे न मिळाल्यास आपले लेखपाल, जिला कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. त्यांच्याकडे काम झाले नाही तर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून जारी हेल्पलाइन (155261 किंवा 1800115526 टोल फ्री) वर संपर्क करा. तेथूनही प्रतिसाद न मिळाल्यास मंत्रालयाच्या दुसर्‍या नंबरवर ( 011-24300606, 011-23381092) वर संपर्क करा.

पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.

आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.

जर तुम्ही या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज केला आहे आणि लाभार्थींच्या यादीत नाव तपासायचे असेल तर तुम्हाला सरकारने ही सुविधा ऑनलाईन दिली आहे. पीएम किसान योजना 2020 ची नवी यादी या वेबसाईटवर तपासू शकता.