Video : RBI नं फसवणूकीबाबत ग्राहकांना केलं सावध, सांगितली ‘ही’ महत्वाची माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकांमधील आपले पैसे किती सुरक्षित आहेत याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, २०१९-२० मध्ये तत्कालीन १८ सरकारी बॅंकांमध्ये एकूण १,४,४२७.६५ कोटी रुपयांच्या फसवणूकीची १२,४६१ प्रकरणे समोर आली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढती फसवणूकीची प्रकरणे लक्षात घेता ग्राहकांना इशारा दिला आहे. इंटरनेट बँकिंग वापरताना ग्राहकांनी त्यांचे फोन कॉल, ईमेल, एसएमएस आणि वेबलिंक्सची वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये, असे ट्विट बँकेने केले आहे.

आरबीआयने म्हटले आहे की, शंका असल्यास बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ग्राहक मदत नंबर तपासून घ्या. आरबीआयने ट्विट केले आहे की, सायबर फसवणूक चुटकीसरशी होते, म्हणून सावध रहा. त्यांनी म्हटले आहे की, आपली वैयक्तिक माहिती, कार्डसंबंधी माहिती, बँक खाते, आधार, पॅन कोणालाही सांगू नका. ट्वीटच्या माध्यमातून आरबीआयने म्हटले आहे की, जर तुम्हाला एखाद्या अज्ञात क्रमांकावरून कॉल आला किंवा जर तुम्हाला कोणी बँक खाते क्रमांक विचारला किंवा तुम्हाला केवायसी माहिती विचारली तर तुम्ही ताबडतोब फोन डिस्कनेक्ट करा.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, २०१९-२०२० मध्ये तत्कालीन १८ सरकारी बँकांमध्ये एकूण १,४८,४२७.६५ कोटी रुपयांच्या फसवणूकीच्या १२,४६१ प्रकरणांपैकी सर्वात जास्त फसवणूक एसबीआयमध्ये झाली. नुकतेच एका आरटीआय कार्यकर्त्याने आरबीआयकडून ही माहिती मिळवली होती. एसबीआयनंतर पंजाब नॅशनल बँकेत ३९५ प्रकरणे समोर आली आणि १५,३५४ कोटी रुपयांची फसवणूक झाली. एकूण फसवणूकीपैकी ३० टक्के भाग एकट्या एसबीआयचा आहे. बँक ऑफ बडोदा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like