Update Aadhaar Address Online : कशा प्रकारे घरी बसून ‘आधार’ कार्डमध्ये ऑनलाइन अपडेट केला जाऊ शकतो पत्ता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या प्रत्येकासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. याचा उपयोग बर्‍याच सरकारी आणि खासगी कामांमध्ये केला जातो. अनेकदा आधार कार्डधारकाला त्याच्या आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर किंवा पत्ता अपडेट करणे आवश्यक असते. चुकीचा पत्ता छापल्यामुळे किंवा आधार कार्डमध्ये जुना पत्ता असल्यामुळे तो अपडेट करणे आवश्यक असते . कार्डधारक त्यांच्या आधार कार्डमधील पत्ता घरीच बसून ऑनलाइन अपडेट करू शकतात.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) कार्डधारकांना पत्ता अपडेट करण्याची सुविधा प्रदान करते. त्यासंदर्भात प्राधिकरणाने ट्विट करुन लोकांना या संदर्भात माहिती देखील दिली आहे. यूआयडीएआयने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये पत्ता सहजपणे अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी प्राप्त करून घ्यावा लागेल आणि लॉग इन करून अ‍ॅड्रेस प्रूफचा फोटो स्कॅन करावा लागेल.’ प्राधिकरणाने यासाठी एक व्हिडीओची लिंक देखील आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया.

स्टेप 1. कार्डधारकाने प्रथम यूआयडीएआयची वेबसाइट https://uidai.gov.in/ वर भेट दिली पाहिजे.

स्टेप 2. येथे कार्डधारकास My Adhaar टॅबवर जावे लागेल आणि Update your adhaar वर क्लिक करावे लागेल आणि नंतर Update your address online वर क्लिक करावे लागेल.

स्टेप 3. यानंतर एक नवीन पृष्ठ स्क्रीनवर उघडेल. येथे कार्डधारकास Proceed update address टॅबवर क्लिक करावे लागेल.

स्टेप 4. आता नवीन पृष्ठ पुन्हा स्क्रीनवर उघडेल. येथे कार्डधारकास त्याचा आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करावा लागेल आणि सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप 5. आता कार्ड धारकाला त्याच्या नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी मिळेल. हा ओटीपी प्रविष्ट करुन लॉग-इनवर क्लिक करावे लागेल. (ओटीपी मिळविण्यासाठी आधार कार्डला एक सक्रिय मोबाइल नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे)

स्टेप 6. आता कार्डधारकाला Update address via address proof चा पर्याय दिसेल. कार्डधारकाला यास सिलेक्ट करून आपला नवीन पत्ता प्रविष्ट करावा लागेल.

स्टेप 7. आता कार्डधारकास संबंधित कागदपत्रांचा रंगीत फोटो मोबाइलद्वारे घेऊन स्कॅन करून अपलोड करावा लागेल. त्याबरोबरच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

स्टेप 8. त्यानंतर कार्डधारकाद्वारे पाठविलेला आधार अपडेट करण्यासाठीच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. यानंतर नवीन पत्ता आधार कार्डवर अपडेट केला जाईल. नवीन आधार कार्ड काही दिवसात कार्डधारकांना पोस्टद्वारे दिले जाईल.