‘डेबिट’ ऐवजी ‘क्रेडिट’ कार्ड का वापरायला हवं ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन शॉपिंग करताना आपण अनेकदा डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करतो. अनेकदा वेबसाइटवर पेमेंट करताना एखाद्या बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करण्यावर भरपूर सवलत, आकर्षक कॅशबँक आणि इतर ऑफर देण्यात येतात. याशिवाय काही सामान बुक केल्यानंतर कॅश ऑन डिलीव्हरीचा पर्याय उपलब्ध असतो.

परंतू कार्डचा वापर करताना सावध राहणे आवश्यक असते. अनेदा सल्ला दिला जातो की ऑनलाइन शॉपिंग करताना डेबिट कार्डचा उपयोग टाळावा. अनेक ग्राहक ऑनलाइन शॉपिंग करताना डेबिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्ड ऐवजी तुम्ही डेबिट कार्डचा वापर करतात तर तुमची फसवणूक होऊ शकते. कारण डेबिट कार्ड थेट तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असते आणि तुम्ही यावेळी तुमच्या थेट बँक खात्याचा वापर करत असतात. परंतू जर डेबिट कार्ड वापरताना सायबर हल्ला झाला किंवा ऑनलाइन फ्रॉर्ड झाला तर तुमचे बँक खाते रिकमे होऊ शकते.

पेमेंटसाठी डेबिट कार्डचा वापर केल्याने तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम होणार नाही, शिवाय क्रेडिट कार्डचा पैसा हा तुमच्याकडे नसतो, तर डेबिट कार्डचा पैसा तुमच्या बँक खात्यात असतो. डेबिट कार्ड एटीएममधून रोख रक्कम काढणे, पेट्रोल पंपवर पैसे देणे, हॉटेलिंग, सिनेमा यांचे बील भरण्यासाठी सर्वात सोपी पद्धत आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करता तर तुम्ही क्रेडिट कार्डवरील पैसे तेव्हापर्यंत खर्च करु शकतात जोपर्यंत तुम्ही महिन्याच्या शेवटी क्रेडिट कार्डचे बील भरत नाहीत.

जेव्हा तुमचे डेबिट कार्ड हरवते तेव्हा तुम्हाच्या बँक खात्यातील पैसे उडवले जाऊ शकतात. परंतू क्रेडिट कार्ड द्वारे तुम्ही पैसे जेव्हा खर्च करतात तेव्हा त्या व्यवहारादरम्यान एक अंतर असते, जेव्हा तुम्हाला पैसे द्यायचे असतात तेव्हा बिलिंग सायकलच्या अंतर्गत बील तयार करण्यात येते.

क्रेडिट कार्ड कंपन्या कार्डच्या वापरावर अनेक ऑफर देतात. मूव्ही व्हाऊचर, इंधनावर सवलत, कॅशबॅक ऑफर किंवा रिवार्ड पॉइंट्स देण्यात येतात. परंतू डेबिट कार्डचा वार करताना कोणतीही ऑफर कदाचितच मिळते. क्रेडिट कार्डचा जर तुम्ही चांगला वापर केला तर ते तुमच्यासाठी उत्तम ठरु शकते.

Visit : Policenama.com