Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये घरबसल्या कमवा पैसे, ‘हे’ 4 जॉब ऑप्शन तुमच्यासाठी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असून बर्‍याच कंपन्या लोकांना नोकरीवरून देखील काढत आहेत. देशभरातील बंदीमुळे प्रत्येकजण घरात कैद झाला आहे. लोकांकडे काम असून ते करू शकत नाही, तर काहीजण घरात बसून काम शोधत आहेत. तसेही खाजगी क्षेत्रातील नोकर्‍या बर्‍याच काळानंतर मिळतात. अशात जर तुम्हीही नवीन नोकरीसाठी कॉर्पोरेट कार्यालयाच्या फेऱ्या मारत असाल किंवा आपल्या घरातील खर्चाच्या तणावामुळे आपली सध्याची नोकरी सोडण्याची हिम्मत करू शकत नसाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. अशात तुम्हाला घरी बसून काही काम करायचे असेल, जेणेकरून पैसे येतील तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे…

Social Media Marketing Consultant :- आजच्या काळात सोशल मीडिया कमाईचा एक प्रमुख स्त्रोत बनला आहे आणि कंपन्या त्याबाबत विचार करत आहेत. कंपन्यांना स्वत:ची आणि त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग कन्सल्टंटची गरज असते. अशा लोकांची बाजारात वारंवार मागणी असताना तुम्ही हे काम करू शकत असल्यास हे क्षेत्र तुमच्यासाठी चांगले आहे

IT Specialist : – जवळजवळ प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आयटी स्पेशलिस्टची गरज असते. आपण थोडे प्रशिक्षण घेऊन देखील काम सुरू करू शकता. या कामात Google चे नऊ महिन्यांचे आयटी सपोर्ट प्रोफेशनल सर्टिफिकेट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. असे लोक अर्धवेळ काम करून चांगली कमाई करू शकतात.

Instagram Marketing : – कमाई करण्याचा हा एक चांगला मार्ग असून तुमच्याकडे फोटो आणि व्हिडिओ क्षेत्रात चांगला टॅलेंट असेल तर तुम्हाला बर्‍याच कंपन्यांचे इन्स्टाग्राम फीड भरण्याची ऑफर येऊ शकते. पण तुम्हाला बेसिक ट्रेनिंग आवश्यक असेल. यासाठी तुम्ही ऑनलाईन कोर्स देखील करू शकता. त्यानंतर घरी बसून पैसे कमवणे देखील सुरू करू शकता.

Graphic Designer :- लिंक्ड-इन वर अनेकदा अशा लोकांसाठी व्हेकेन्सी असतात. पूर्ण वेळ आणि फ्रिलान्सिंगसाठी अशा लोकांची खूप मागणी आहे. असे म्हटले जाते कि ग्राफिक्स आपला मुद्दा सरळ आणि प्रभावीपणे सोशल मीडियावर ठेवण्यात मदत करतात. या क्षेत्रात रोजगाराच्या अपार संधी आहेत.