नंदुरबार : Toranmal Hill Station | पर्यटनाच्या ठिकाणी अतिउत्साहामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत. पर्यटनाला गेल्यावर धोकादायक ठिकाणी सेल्फी काढताना पाय घसरुनही अनेकजण खोल दरीत पडल्याच्या घटना आहेत. अशीच घटना तोरणमाळ येथून समोर आली आहे. (Toranmal Waterfall Accident)
तोरणमाळ येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा तब्बल १५०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. पाय घसरून तोल गेल्याने तो दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी तोरणमाळ येथे काही तरुण पर्यटनासाठी आले होते. याच तरुणात शिरपूर तालुक्यातील भरत पावरा याचाही समावेश होता. हे सर्व तरुण प्रसिद्ध असलेल्या सीताखाई धबधब्याचा परिसरात गेले होते. पण यावेळी भरत पावराचे मित्र पुढे निघून गेले. या परिसरात दाट धुके होते.
त्यामुळे भरत पावरा हा मागे राहिल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले नाही. सायंकाळी घरी जात असताना भरत नसल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक गावकरी आणि नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. सलग दोन दिवस परिसरात त्याच्या शोध घेण्यात आला. मात्र त्याचा शोध न लागल्याने म्हसावद पोलिसात तक्रार करण्यात आली.
त्यानंतर खोल दरीत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला.
मृतदेह बाहेर काढल्यानंतर दरीत आढळलेला मृतदेह हा बेपत्ता भरत याचाच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
दाट धुकं असल्याने त्याला दिसले नसावे परिणामी पाय घसरून खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झालेला
असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
तोरणमाळ याठिकाणी अनेकजण जीव धोक्यात घालून सेल्फी काढताना दिसतात परिणामी अनेकवेळा दुर्घटना घडल्या आहेत.
त्यामुळे या परिसरात योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणीही सातत्याने केली जातेय.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा