आता सेल्फी व्हिडीओ देणार ‘ब्लड प्रेशर’ची 95% ‘खरी’ माहिती – संशोधकांचा दावा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता लवकरच तुम्हाला तुमचे ब्लड प्रेशर तपासण्यासाठी डॉक्टारांकडे फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. टोरंटो यूनिवर्सिटीमधील शोधकर्त्यांनी आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्याने ब्लड प्रेशर तपासण्याचा शोध लावला आहे. मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्याद्वारे तुम्हाला हे करता येणार आहे. चीन आणि कॅनडामधील १३२८ नागरिकांवर याविषयी संशोधन करण्यात आले असून ९० ते ९५ टक्के योग्यतेसह तीन प्रकारच्या ब्लड प्रेशर तपासणीमध्ये यश आले आहे.

अशा प्रकारे काम करतो कॅमेरा

१) टोरंटो यूनिवर्सिटीतील शोधकर्ता पॉल झेंग याने यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केले असून ‘ट्रांसडर्मल ऑप्टिकल इमेजिंग’ या नावाचे हे तंत्रज्ञान आहे. याच्या मदतीने चेहऱ्याच्या त्वचेच्या मदतीने आपण ब्लड प्रेशर तपासू शकतो. यासाठी त्यांनी दोन मिनिटाचा सेल्फी व्हिडीओ देखील तयार केला आहे.

२) मोबाईल कॅमेऱ्याला लागलेला ऑप्टिकल सेंसरने चेहऱ्यावर पडणाऱ्या लाल किरणांना कॅप्चर करत आपल्या त्वचेच्या खाली असलेल्या हीमोग्लोबिनमुळे रिफ्लेक्ट होतात. त्यानंतर ट्रांसडर्मल ऑप्टिकल इमेजिंग तंत्रज्ञान या परिवर्तित होणाऱ्या किरणांच्या मदतीने शरीरातील रक्तदाबाचा अंदाज लावतात.

३) शोधकर्त्यांच्या मते हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या हायपर टेंशनच्या प्रकरणांमध्ये मदत ठरणार आहे. ज्या ठिकाणी आरोग्य सुविधा लवकर उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे मोबाईल किंवा कॉम्प्युटर असल्यास तुम्ही तात्काळ याची माहिती डॉक्टारांना देऊ शकता.

४) न्यूरालॉजिक्स या कंपनीने एनुरा नावाचे एक अ‍ॅप लाँच केले असून याद्वारे तुमच्या तीस मिनिटाच्या सेल्फी व्हिडिओद्वारे तणाव आणि हृदयाच्या ठोक्यांचा अचूक अंदाज लावणार आहेत. लवकरच याला चीनमध्ये लाँच केले जाणार असून लवकरच जगभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आरोग्यविषयक वृत्त