पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू ; माजी नगरसेवक ताब्यात

मिरज : पोलीसनामा ऑनलाइन – माजी नगरसेवकाच्या खासगी सावकारकीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने मिरज पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरुणावर उपचार सुरु असताना आज (मंगळवार) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहसीन बागवान असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक साजिद पठाण याला ताब्यात घेतले आहे.
साजिद पठाण याच्या त्रासाला कंटाळून मोहसीन बागवान याने तीन दिवसांपूर्वी मीरज शहर पोलीस ठाण्यात विष प्राशन केले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोहसीनला मीरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी मोहसीन याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्याने माजी नगरसेवक साजित पठाण आणि त्याचा भाऊ बबलू पठाण यांच्याकडून २० टक्क्यांनी ५० हजार रुपये कर्ज घतले होते. या कर्जापोटी आपण १ लाख ७५ हजार रुपये दिले असताना दोघांकडून पैशांसाठी तगादा लावून मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी पठाण बंधूंच्या घरावार छापा मारला होता मात्र ते सापडले नाहीत. मोहसीनचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर लगेच पोलिसांनी कारवाई करून माजी नगरसेवक साजिद पठाण याला ताब्यात घेतले.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन