Winter diet : सर्दी-तापाची समस्या वाढवतात ‘या’ 6 वस्तू, हिवाळ्यात ठेवा दूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हिवाळ्यात फ्लू किंवा सर्दी-कफची समस्या वाढते. या काळात आपली इम्युन सिस्टिमसुद्धा कमजोर होते, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. यावेळी कोरोना व्हायरसमुळे इम्युनिटीला मजबूत ठेवण्यावर खूप जोर दिला जात आहे. हिवाळ्यात कोणते खाद्य पदार्थ टाळले पाहिजेत, ते जाणून घेऊयात…

1 डेअरी प्रॉडक्ट

हिवाळ्यात डेअरी प्रॉडक्ट टाळावेत. यामुळे सर्दी आणि कफ वाढतो. मात्र, याचा वापर पूर्ण बंद करू नका. प्रमाण कमी करा.

2 कॅफीन

कॅफीनयुक्त प्रॉडक्ट जसे की, कॉफी, चहा आणि सॉफ्ट ड्रिंक्स शरीराला आतून डिहायड्रेट करतात, ज्यामुळे कफ आणि सर्दी-ताप होतो. तसेच इम्युनिटीसुद्धा कमजोर होते.

3 तळलेले, भाजलेले पदार्थ

हिवाळ्यात तळलेले, भाजलेले पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो, शिवाय सर्दी, खोकल्याची समस्या गंभीर होऊ शकते. जंक, फॅटी फूडने कफ वाढतो.

4 हिस्टामिनयुक्त खाद्य पदार्थ

आपली इम्युन सिस्टम अ‍ॅलर्जीसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी हिस्टमिन केमिकलची निर्मिती करते. सर्दी किंवा अ‍ॅलर्जी झाल्यास हिस्टामिन कफ पातळ करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. या प्रक्रियेत कफ बनण्यासह नाक वाहू लागते. खाण्याच्या काही पदार्थांमध्ये हिस्टामिन जास्त प्रमाणात असते, जे ही समस्या आणखी वाढवू शकते. हिवाळ्यात अवोकाडो, मशरूम, स्ट्रॉबेरी, ड्राय फ्रूट्स, दारू, दही, व्हिनेगर आणि फर्मेंटेड फूड टाळा.

5 दारू

दारू सूज वाढवते. यामुळे सफेद रक्तपेशी आणखी कमजोर होतात. शरीर बरे होण्यास उशीर होतो. इम्युन सिस्टिम कमजोर होते. यामुळे दारू टाळा.

6 गोड पदार्थ

गोड पदार्थसुद्धा सूज वाढवतात आणि इम्युन सिस्टिम कमजोर करतात. यामुळे सर्दी-खोकलासुद्धा गंभीर होऊ लागतो. यासाठी गोड पदार्थ टाळले पाहिजेत.