रायपूर :वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस पार्टीतील 17 जवान शहीद झाले आहेत तर 14 जवान जखमी झाले असून काही बेपत्ता झाले आहेत. या जवानांचा शोध घेण्यासाठी 150 जणांची पोलीस तुकडी घटनास्थळाकडे रवाना करण्यात आली आहे.
Total 17 security personnel (5 STF + 12 DRG) have lost their lives in an encounter in Sukma, yesterday. They were missing and security forces were trying to locate them after an encounter with naxals: Chhattisgarh Police pic.twitter.com/4qhUiOxs5U
— ANI (@ANI) March 22, 2020
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पोलिसांना माओवादी मोठा कट रचत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांची एक तुकडी जंगलात त्यांचा शोध घेत होती. त्यावेळी मोओवाद्यांशी त्यांची चकमक उडाली. जंगलात रात्री हा प्रकार सुरु होता. या चकमकीची माहिती मिळाल्यावर रायपूरहून जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉटर पाठविण्यात आले. रात्र व पावसाचे वातावरण असतानाही हेलिकॉटर खाली उतरविण्यात आले. त्यातून या चकमकीत जखमी झालेल्या काही जवानांना रायपूरला आणण्यात आले. या हल्ल्यात तब्बल 17 जवान शहीद झाले आहे.