‘या’ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 18 पोलिस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाईन – मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एकूण 18 पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे . एकाच वेळी या पोलीस ठाण्यातील पोलीस कोरोनाग्रस्त झाले असून ते रुग्णालयात आणि कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. हे सर्व पोलीस कोरोना आजारातून बरे व्हावेत, अशी सदिच्छा दिल्या जात आहेत. शहरात कोरोना विषाणूच्या लागणची सुरवात मार्च अखेरीस नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली होती. त्यातही सुरवातीला कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण अधिक नया नगर भागात आढळले होते. त्या भागातील लोकं लॉकडाऊनचे पालन करत नाहीत म्हणून सुरवातीला तक्रारी येत होत्या. परंतु नया नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वेसह पोलिसांनी नया नगरमध्ये विविध उपायोजना आणि कारवाई करून लॉकडाऊनचे काटेकोर अंमलात आणले. जेणे करून नया नगर भागात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण नगण्य झाले होते.

परंतु या आठवड्यात नया नगर पोलीस ठाण्याचे एका पाठोपाठ एक असे 18 पोलीस कोरोनाग्रस्त झाले आहेत. स्वतः बर्वे यांच्यासह अन्य तीन पोलीस उपनिरीक्षक आणि 14 पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याची चाचणी अहवालातून निष्पन्न झालेे. एकाच वेळी इतके पोलीस कोरोनाग्रस्त आढळल्याने खळबळ माजली आहे. अगोदरच पोलीस ठाण्यातील पोलीस बळ 80 इतके कमी असताना त्यात 18 पोलीस अधिकारी आणि कमर्चारी कोरोनामुळे कर्तव्यावर हजर राहू शकणार नाहीत. त्यात लॉकडाऊन खुले केल्याने लोकांकडून नियमांचे उल्लंघन होईल. यावर नियंत्रण ठेवणे अवघड जाणार आहे . तर हे सर्व पोलीस लवकरच कोरोना विषाणूच्या आजारातून बरे होऊन परत सेवेत यावेत, अशा सदिच्छा व्यक्त होत आहेत. या अगोदर देखील 13 पोलीस कोरोनाग्रस्त झाले होते. त्यामुळे नया नगर पोलीस ठाण्यातील आतापर्यंत एकूण 31 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाग्रस्त झालेले आहेत.

सुजाण नागरिकांची आवश्यकता
कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांनाही आता कोरानाने विळख्यात अडकडले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनीच लॉकडाऊन आणि अनलॉकचे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी पोलिसांनीच कायदा आणि नियम यांचे पालक करा, असे आवाहन करत होते. आता नागरिकांनीच स्वत:हून कायदा आणि नियम यांचे पालन केल्यास त्या त्या भागात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जाईल. तसेच सुजाण नागरिक म्हणूनही त्या भागातील नागरिकांना/लोकांना ओळखले जाईल, असे समजते.कोरोनासह पोलिसांनाही कोरोना योध्दे म्हणून ओळखले जात आहेत. राज्यात अनेक पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली असून यातील बरेच पोलीस आणि अधिकारी यांनी देखील कोरोना आजारावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे देखील कोरोनामुक्त व्हावेत, अशी सदिच्छा देखील नागरिक देत आहेत.