धोका कायम, राज्यातल्या ‘कोरोना’ रुग्णांच्या संख्येने ओलांडला 19 लाखांचा टप्पा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा (Covid -19) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 19 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. रुग्ण संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळालेला आहे. असे असले तरी येणारे काही दिवस महत्त्वाचे असल्याने अद्याप धोका टळलेला नाही, असा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

मंगळवारी दिवसभरात 4 हजार 122 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आत्तापर्यंत 17 लाख 94 हजार 80 वर गेली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 94.3 वर गेला आहे. दिवसभरात 3 हजार 106 नवे रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 4 हजार 258 एवढी झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.57 वर गेला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या राज्यात 58 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाव्हायरसची प्रकरण वाढू लागली असून कोरोनाचं नवं स्वरुप समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. यूकेमध्ये SARS – C0V -2 चा जो नवा स्ट्रेन दिसून आला आहे, तो अधिक संसर्गजन्य आहे. पण कोरोना व्हायरसमधील हा बदल गंभीर आजार निर्माण करणारा नाही किंवा त्यामुळे मृत्युचा धोका अधिक आहे असेही नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या D614G म्युटेशनमध्ये बदल होऊन नवा स्ट्रेन तयार झाला आहे. नव्या बदलामध्ये 23 जेनेटिक बदल सून आले असून अपेक्षेपेक्षा हे बदल जास्त असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

व्हायरसच्या संरचनेत बदल
म्युटेशन म्हणजे वायरसच्या जेनेटिक सिक्वेन्समधला बदल. COV -2 अर्थात कोरोना हा आरएनए वायरस आहे. त्याचे रेणू ज्या क्रमात रचलेले असतात त्या संरचनेत इथे बदल होतो. या नव्या व्हायरसवरच्या स्पाइक प्रोटिनची रचना बदललेली आहे. या स्पाइक प्रोटिनद्वारे व्हायरस मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो. हा 40 ते 70 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं.

शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भिती
शास्त्रज्ञांना अशीही भिती वाटते, की कोट्यावधी लोकांनी लस घेतल्यानंतर अजूनच प्रभावीपणे रुप बदलण्यासाठी कोरोनाव्हायरस प्रवृत्त होऊ शकतो.