‘टोटल धमाल’ चित्रपटातील अजयचा ‘टोटल धमाल’ लुक झाला व्हायरल 

मुंबई : वृत्तसंस्था – अजय देवगण याचा ‘तानाजी’ आणि ‘टोटल धमाल’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसापूर्वी ‘तानाजी’ मधील त्याचा फर्स्ट लूकदेखील प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ‘टोटल धमाल’ या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकही प्रेक्षकांसमोर आला आहे. अजयचा हा लुक रावडी दिसत असून त्याचा खांद्यावर माकड बसल्याचे दिसून येत आहे. या माकडाचे नाव क्रिस्टल असून तो हॉलिवूडच्या ‘हैंगओवर 2’, ‘जॉर्ज ऑफ द जंगल’ आणि ‘नाइट एट द म्यूजियम’ यांसारख्या चित्रपटात झळकला होता.

अजयने सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. या चित्रपटामध्ये अजयसोबत माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अरशद वारसी, रितेश देशमुख हे कलाकार सुद्धा असणारआहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही हीट जोडी १७ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.

याआधी धमाल चित्रपटाचे दोन भाग सुपरहिट झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्रकुमार करणार असून  पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही खूप मोठी स्टारकास्ट आहे. त्यामुळे हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर किती धमाल करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like