Coronavirus : देशात सर्वाधिक ‘कोरोना’चे रूग्ण महाराष्ट्रात, आकडा पोहचला 193 वर

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून बाधितांची संख्या आज 193 वर पोहोचली आहे. पुण्यात 1, मुंबईत, 4 सांगलीमध्ये 1 तर नागपुरात 1 असे नवीन 7 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढऴल्याने 186 वर हा आकडा पोहोचला होता. तर मुंबईमध्ये 108 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दिवसेंदिवस वाढणार्‍या या आकड्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण देशात कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाऊन आदेश असतानाही अनेक जण ते गांभीर्याने घेत नसल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे.

कोरोनाचे वाढत्या आकड्यांमुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाणार का अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारवर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अहमदाबाद इथे 45 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुजरातमधील कोरोनाग्रस्ताचा हा पाचवा मृत्यू आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा महाराष्ट्रील वाढता धोका लक्षात घेता सरकार आणि पोलिसांकडून घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like