Coronavirus : पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 449 ने वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विभागातील 17 हजार 911 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 29 हजार 697 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 10 हजार 652 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1134 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 537 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.82 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 24 हजार 558 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 14 हजार 494 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 274 आहे. कोरोनाबाधित एकूण 790 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 405 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.02 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.22 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 449 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1237, सातारा जिल्ह्यात 95, सोलापूर जिल्ह्यात 83, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 18 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 1145 रुग्ण असून 743 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 355 आहे. कोरोनाबाधित एकूण 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 727 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 710 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 744 आहे. कोरोना बाधित एकूण 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 399 रुग्ण असून 239 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 148 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 868 कोरोना बाधीत रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 131 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 83 हजार 798 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 79 हजार 691 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 107 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 49 हजार 652 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 29 हजार 697 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. ( टिप :- दि. 2 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )