असाही विजय… केवळ १८१ मतांनी भाजपचा हा उमेदवार विजयी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेवर तरलेल्या उमेदवारांनाही लाखोंच्या मताधिक्याने विजय मिळाला. परंतु भाजपचा असा एक उमेदवार आहे की जो अटीतटीच्या लढतीत केवळ १८१ मतांनी निवडून आला आहे. उत्तरप्रदेशातील मछली शहर मतदारसंघात ही अटीतटीची लढत झाली.

उत्तरप्रदेशातील मछली शहर मतदारसंघात भाजपचे उमेदवार भोलानाथ आणि बसपाचे उमेदवार त्रिभूवन राम यांच्यात चुरशीची लढत झाली. मतमोजणी सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत जसजशी आकडेवारी समोर आली, तसतशी कोण निवडून येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कार्यकर्त्यांसह मतदारही हवालदिल झाले होते. परंतु अखेरीस केवळ १८१ मतांची आघाडी घेत त्रिवभवन राम यांचा भोलानाथ यीं पराभव केला.

भोलानाथ यांना ४८८३९७ मते मिळाली तर बसपाचे उमेदवार त्रिभूवन राम यांना ४८८२१६ मते मिळाली. तर गेल्या निवडणूकीत भाजपच राम चरित्र निषाद यांना पावणेदोन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळाला होता.

येथेही झाल्या चुरशीच्या लढती

लक्षद्वीपमध्ये भाजपचे उमेदवार हमदुल्ला सईद यांच्यावर ८२३ मतांची आघाडी मिळवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मोहम्मद फैजल यांनी विजय मिळविला.

तर झारखंडमधील खुंटी मतदारसंघात भाजपच्या अर्जून मुंडा यांनी भाजपच्या कालीचरण मुंडा यांचा ११४५ मतांनी पराभव केला. अंदमान निकोबारमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार कुलदीप राय शर्मा यांनी भाजपच्या विशाल जॉली १४०७ मतांनी पराभव केला. त्याबरोबरच आरामबाम मतदारसंघात तृणमूल कॉंग्रेसचे अफरीन अली ११४२ मतांनी विजयी झाले.