गणेशोत्सवात थर्माकॉल व्यावसायिकांचा ‘शिमगा’

पुणे : प्रेरणा खोत

जसजसा गणेशोत्सव जवळ येतोय तसे घरगुती गणपती करिता मखर घेण्यासाठी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांची देखील सजावटीसाठी लगबग सुरु आहे. यंदा राज्य शासनाने थर्माकॉल वर बंदी आणल्यामुळे थर्माकॉल चे मकर आणि सेट करणाऱ्या व्यावसायिकांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सर्रास मखर आणि सजावटीकरिता थर्माकॉल चा वापर केला जायचा मात्र आता बंदीचा असल्यामुळे थर्माकोल व्यावसायिकांवर या बंदीचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

याबाबत पुण्यातील प्रसिद्ध थर्माकॉल व्यावसायिक ‘कलाल बंधू’ अंकुश कलाल आणि अभय कलाल यांना विचारले असता त्यांनी थर्माकोल बंदीचा परिणाम व्यवसायावर होत असल्याचे सांगितले. जे व्यावसायिक फक्त थर्माकॉल चे डेकोरेशन, मखर करायचे त्यांच्यावर जवळपास ९० टक्के बंदीचा परिणाम झालेला दिसून येतो. पण जे व्यावसायिक थर्माकॉल सोबत इतर वस्तूंपासून मखर तयार करतात त्यांच्यावर बंदीचा परिणाम कमी झाल्याचे कलाल यांनी सांगितले. १६९६ पासून ‘कलाल बंधू’ या व्यवसायात आहेत. मात्र यंदा थर्माकोल बंदीमुळे ७० % लोकांनी थर्माकोल वापरण्यास मनाई केल्याचे सांगितले. या बंदीचा जास्त परिणाम होताना दिसतो आहे. त्यामुळे थर्माकॉल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. गणेशोत्सावाची तयारी वर्षभर चालू असते. सार्वजनिक गणेश मंडळांकडून थर्माकोलच्या सेटची सार्वाधिक मागणी होत असते. कलाल यांच्याकडे जवळपास २-३ लाखांचे काम येत होते मात्र आता बंदीमुळे मोठा परिणाम झाल्याचे कलाल यांनी सांगितले. तसेच थर्माकोल ला पर्याय म्हणून फायबर ग्लास, प्लास्टर ऑफ पॅरिस, वुडन मटेरियल ला मागणी असल्याचे कलाल यांनी सांगितले .

कारागिरांवर बंदीचा परिणाम

थर्माकोलवर नक्षिकाम करणाऱ्या कारागिरांवर देखील थर्माकॉल बंदीचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः सार्वजनिक गणशोत्सवाकडून करवून घेण्यात येणाऱ्या सजावटीकरिता मोठी मागणी असायाची मात्र आता बंदी असल्यामुळे या कारागिरांनी लाकडी नक्षीकाम करण्यास सुरुवात केल्याचे कलाल यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B01C1Z3E90,B01IFR3DVW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’96befb1c-b4ec-11e8-85d9-8dd7f0615d17′]

बंदीमुळे खायचे वांदे…

याबाबतीत १५ वर्षांपासून थर्माकॉल चा व्यावसाय करणारे सचिन पानसे यांच्याशी बातचीत केली असता . बंदीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असल्याचे ते म्हणाले. बंदीमुळे ग्राहकाने थर्माकोल कडे पाठ फिरवली आहे. गणेशोत्सव काळ हा आमच्याकरिता खूप महत्वाचा असतो. पण तयार केलेला माल देखील पडून आहे त्यामुळे जवळपास ९० टक्के प्रोडक्शनवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ‘खायचे वांदे झाले आहेत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया पोलीसनामाशी बोलताना दिली. थर्माकोलवर बंदी आणल्यानंतर आम्ही मुदत वाढवण्यासाठी, बंदी मागे घेण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट ते करण्यात वेळच खर्ची पडला अशी प्रतिक्रिया पानसे यांनी दिली. थर्माकॉलला पर्याय कागदाचा आहेच पण यामुळे झाडांची कत्तल होते त्याचे काय? पर्यावरणाचा आता ऱ्हास होणार नाही का? असा सवाल देखील त्यांनी केला. तसेच थर्माकोल रिसायकलिंगचा पर्याय होताच असे ते म्हणाले.

एकूणच पर्यावरण पूरक गणेशत्सव साजरा करण्याकडे सर्वांचा कल असताना थर्माकॉल बंदीमुळे मात्र यंदाचा गणेशोत्सव कडूच जाणार असे दिसते आहे.