भंडाऱ्यात पर्यटकांची कार दरीत कोसळली ; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सव पाहून परतत असताना पर्यटकांची गाडी दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. चारही पर्यटक संगमनेर शहरातील आहेत.

संकेत यशवंत जाधव (वय२४, मूळ रा. चिंचोली गुरव, हल्ली संगमनेर) असे मयताचे नाव आहे. दत्ता यशवंत शेणकर (वय २९) व पांडूरंग तानाजी जाधव (वय २६), प्रवीण सुभाष डफेकर (वय २४, सर्व रा. घोडेकर मळा, संगमनेर) हे तिघे जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, भंडारदरा धरणाच्या परिसरात स्थानिकांच्या मदतीने येथे दरवर्षी काजवा महोत्सव भरविला जातो. लाखो पर्यटक या ठिकाणी काजवे पाहण्यासाठी गर्दी करातात. या परिसरात रात्री भटकंती करण्यासाठी येत आहेत.

यामुळे शेंडी ते घाटघर या परिसरात रात्री चारचाकी गाड्यांची गर्दी होत आहे. संगमनेर येथील संकेत जाधव आणि त्याचे तीन मित्र मारुती स्विफ्ट (एम. एच. १२ एच. एल. १८३३) गाडीने भंडारदरा परिसरात काजवे पाहण्यासाठी आले होते.

शनिवारी चौघे काजवे पाहून परत येत असताना भंडारदरा-रतनवाडी रस्त्यावर मुतखेल जवळील वळणावर गाडी अचानक पलटी होऊन सुमारे ८० ते ९० फूट खोलदरीत कोसळली. या वेळी भीषण अपघातात गाडी चालवत असलेल्या संकेत जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले.

आरोग्य विषयक वृत्त –

‘या’ उपायाने होते मांड्यांची चरबी कमी

लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे

स्वाईन फ्लूसाठी नवी औषधे द्या, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडे मागणी

अशी घ्या मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी