‘सेक्स दरम्यान टूरिस्ट मुलीनं सांगितलं गळा दाबा’, ‘जीव’ गेला फुकटात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून येथील एका मुलीचा संबंध ठेवत असताना गळा दाबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याने या मुलीने सांगितल्यामुळे आपण तसे केल्याचे पोलिसांना सांगितले. हि मृत 22 वर्षीय ब्रिटिश मुलगी न्यूझीलंडला फिरायला आली होती.

आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी हि ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ या सिनेमाची मोठी फॅन होती. संबंध बनवण्याच्या वेळी तिने त्या पद्धतीने त्याला करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने तिचा गळा आवळला असता मृत्यू झाला. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून गाडून टाकला. या दोघांची भेट हि टिंडरवरून झाली होती.

पोलिसांनी या आरोपीची ओळख जाहीर केली नसून त्याने देखील अतिप्रमाणात गोळ्यांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने आपण मुलीच्या घरच्यांना सर्व सांगण्यास तयार असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. दरम्यान, खुनाच्या गुन्ह्याचा त्याने इन्कार केला असून याला दुर्घटना म्हटले आहे. तसेच या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी त्याची अधिक चौकशी सुरु आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like