मोदी सरकारकडून पर्यटकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी नवीन ‘तक्रार निवारण यंत्रणा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील पर्यटन व्यवसायाच्या भविष्यातील संधी लक्षात घेता सरकार याकडे गेल्या काही वर्षांपासून लक्ष पुरवताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळीची प्राप्ती सरकारला होत असते. त्याचबरोबर जगभरातील लोकांना आपल्या देशाची आणि संस्कृतीची ओळख करुण देण्याची ही चांगली संधी मानली जाते. आता पर्यटनाची सुविधा आणखीन चांगली व्हावी. यासाठी पर्यटन मंत्रालय ट्विटरच्या माध्यमातून तक्रार निवारण प्रणाली सुरु करन्यायाची योजना तयार करत आहे.

या योजनेनुसार आता पर्यटक आपली समस्या ट्विटरद्वारे थेट सरकारपर्यंत तात्काळ पोहचवू शकणार आहेत. या प्रकारची ट्विटरद्वारे तक्रार नोंदणी आणि निवारण व्यवस्था याआधी परराष्ट्र मंत्रालयाने २०१६ साली बनवली आहे आणि त्यामाध्यमातून उत्तम प्रकारे काम केले जात आहे. पर्यटन मंत्रालय देखील आता परराष्ट्र मंत्रालयासारखी सुविधा पुरवण्याच्या विचारात आहे.

पर्यटन मंत्र्यांची यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक :

पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी यासंदर्भात ट्विटरच्या अधिकाऱ्यांची बैठक या सप्ताहाच्या सुरुवातीलाच घेतली होती. यावेळी त्यांनी पर्यटकांना ट्विटरद्वारे आपल्या समस्यांची नोंदणी सरकारकडे करता करावी म्हणजे सरकार तात्काळ त्या समस्यांचं निवारण करू शकेल. यासाठी विशेष प्रकारची यंत्रणा उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश ट्विटरच्या अधिकाऱ्यांना दिले होते.

सध्या रेल्वे, परकीय इत्यादी मंत्रालये लोकांच्या समस्या थेट सरकारपर्यंत पोहोचाव्यात. यासाठी सोशल मीडिया चा वापर करताना दिसत आहेत. अशी यंत्रणा सरकार आणि नागरिक अशा दोघांसाठीदेखील फायद्याची ठरत असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या घडीला पर्यटक आपल्या तक्रारी 24×7 टोल-फ्री हेल्पलाइन वर संपर्क करून कळवू शकतात.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?