हौशी पर्यटकांनी सेल्फी साठी नांदुरमध्यमेश्वर धरणावर जीवघेणा स्टंट

लासलगाव – नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतांना हौशी पर्यटकांनी सेल्फी फोटोग्राफीसाठी निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर धरणा समोरील पुलावर जीवाची पर्वा न करता गर्दी केल्याचे दिसत आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने धरणक्षेत्र परिसरात येण्यास फलक लावून मज्जाव करण्यात आले असतांनाही युवक स्टंट करत असताना दिसत आहे.

नांदूरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी जायकवाडी च्या दिशेने 9 हजार 684 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असतांना मोठ्या प्रमाणात धाडस करून सेल्फी फोटोग्राफीचे प्रमाण वाढलेले आहे याठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरु असतांना कायम पोलीस बंदोबस्त मिळाला पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे त्यामुळे जीवघेणा सेल्फी व स्टंटबाजी प्रकाराला आळा बसण्यास मदत होईल

नासिक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे दारणा, गंगापूर आणि पालखेड या धरणातून विसर्ग सुरू असल्याने निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरण क्षेत्रात पाणीपातळीत वाढ झाल्याने पाच वक्राकार गेटमधून 9 हजार 684 क्यूसेक पाण्याचा जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरू आहे यंदाच्या पावसाळी हंगामात आज सकाळी 6 वाजेपर्यंत 20 टीएमसीहून अधिक पाण्याचा गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीत पाण्याचा विसर्ग झाला आहे. मात्र काही युवक हे सेल्फीचा नादात धरण परिसरात गर्दी करत असल्याचे घक्का दायक चित्र दिसत आहे