Toxic Shock Syndrome | महिलांसाठी जीवघेणा आहे टॉक्सिक शॉक सिंड्रोम, जाणून घ्या याची लक्षणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टॉक्सिक शॉक सिंड्रोम एक असा आजार आहे जो शरीरासाठी खुप धोकादायक आहे. हा स्टॅफिलोकोकस ऑरियस किंवा स्टॅफ नावाचे बॅक्टेरिया खुप जास्त वाढल्याने होतो. हे बॅक्टेरिया महिलांच्याच शरीरात आढळतात. Toxic Shock Syndrome सामान्यपणे पीरियड्सच्या काळात महिलांना जास्त प्रभावित करतात, विशेषता त्या महिलांना ज्या टॅम्पोनचा वापर करतात.

Toxic Shock Syndrome मध्ये ब्लड प्रेशर वेगाने वाढू लागते. यामुळे शरीरात योग्य प्रकारे ऑक्सीजन न पोहचल्याने मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अमेरिकेची 24 वर्षांची एक मॉडल लॉरेन वासेर हिला 2012 मध्ये हा आजार झाला होता. लॉरेनच्या शरीरात विषाक्त पदार्थ इतके जास्त झाले होते की, ती आपल्या पायांवर सुद्धा उभी राहू शकत नव्हती. अखेर तिला आपला एक पाय कापावा लागला.

टॉक्सिक शॉक सिंड्रोमला मेन्स्ट्रुअल स्पाँज, डायाफ्राम आणि सर्व्हायकल कॅम्पशी सुद्धा संबंधीत असल्याचे म्हटले आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर ताबडतोब सुद्धा महिलांमध्ये Toxic Shock Syndrome होण्याची शक्यता वाढते. हा त्या महिलांना होऊ शकतो ज्या सर्जरी, जळणे, उघडी जखम किंवा नकली उपकरणाच्या वापरादरम्यान स्टॅफ बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्या आहेत.

Toxic Shock Syndrome ची लक्षणे –
अचानक जास्त ताप येणे, ब्लड प्रेशर कमी होणे, हाताच्या तळव्यावर रॅशेज येणे, भ्रमाची स्थिती, मांसपेशीमध्ये वेदना, लाल तोंड-डोळे, झटका येणे आणि डोकेदुखी याची सामान्य लक्षणे आहेत. पीरियड्सदरम्यान टॅम्पोनचा वापर करता असाल आणि यावेळी जास्त ताप किंवा उलटी सारखे वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

टॉक्सिक शॉक सिंड्रोमची कारणे –

स्टॅफिलोकोकस ऑरियस बॅक्टेरिया शरीरात एक प्रकारचे विष तयार करतो ज्याच्यामुळे Toxic Shock Syndrome होतो. हा बॅक्टेरिया अनेक स्टॅफ बॅक्टेरियापैकी एक आहे जो जळालेला रूग्ण किंवा ते लोक ज्यांना स्किन इन्फेक्शन होते ज्यांची सर्जरी झाली आहे.

स्टॅफ एक असा बॅक्टेरिया आहे जो महिलांच्या वजाइनामध्ये असतो परंतु सामान्यपणे कोणतेही नुकसान करत नाही. टॅम्पोनमुळे या बॅक्टेरियाला शरीरात पसरण्यास संधी मिळते. यानंतर हा बॅक्टेरिया विष तयार करण्यास सुरूवात करतो जे हळुहळु रक्तात मिसळते.

असे होते निदान –
डॉक्टर यासाठी ब्लड किंवा यूरीन सॅम्पलची चाचणी करतात.
तसेच वजाइना, सर्व्हिक्स किंवा घशाचा स्वॅब घेतात.
शरीराच्या इतर भागावर याचा किती परिणाम झाला आहे यासाठी सीटी स्कॅन किंवा चेस्ट एक्स-रे सुद्धा करू शकतात.

टॉक्सिक शॉक सिंड्रोमचा उपचार –
सामान्यपणे Toxic Shock Syndrome चा उपचार अँटीबायोटिक औषधाने केला जातो.
याशिवाय ब्लड प्रेशर नियंत्रित करणारी औषधे आणि शरीरात पाण्याची मात्रा वाढवण्यासाठी द्रव पदार्थ सुद्धा दिले जाऊ शकतात.
शरीरात हा सिंड्रोम कोणत्या स्टेजवर आहे, यावर उपचार अवलंबून असतो.
यासाठी टॉक्सिक शॉक सिंड्रोमच्या सुरुवातीच्या लक्षणांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Web Title :-  womens health toxic shock syndrome symptoms treatment

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

Pune News | शेरेबाजी करण्यापेक्षा पाटील यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत – माजी आमदार मोहन जोशी

फायद्याची गोष्ट ! मुलांसाठी ‘या’ बँकेनं ने सुरू केली विशेष सुविधा, राहणार नाही भविष्याची चिंता; होईल मोठा फायदा

Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य