#Video : रेल्वेमध्ये मोदी, सोनिया, राहुल गांधींची नक्‍कल करत ‘सोशल’वर ‘फेमस’ झालेला ‘तो’ फेरीवाला गजाआड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्रेन मध्ये खेळणी विकणाऱ्या विक्रेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. राजकीय पुढाऱ्यांवर भाष्य करणारा हा खेळणीविक्रेता सोशलवर खूप व्हायरल झाला होता. पण या खेळणीविक्रेत्याला रेल्वे पोलिसांनी सुरत मधून अटक केली आहे. या खेळणीविक्रेत्याचे नाव अविनाश दुबे असे आहे. जो मूळचा बनारस येथील राहणारा आहे.

रेल्वेत अवैधरित्या घुसखोरी, रेल्वेत गोंधळ घालणे आणि अभद्र भाषेचा उपयोग करणे याबरोबरच अन्य बाबींकरिता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर अवैधरित्या रेल्वेत सामान विक्री करण्याबाबत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओ

हा खेळणी विकणारा माणूस आपल्या खास अंदाजात राजकीय घडामोडींवर भाष्य करतो. राजकीय व्यक्तीबाबत बोलताना त्याची पातळी देखील घसरते. हे व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येते. केवळ राजकारणच नाही तर हा खेळणीविक्रेता देश, आणि समाजावर कडक भाष्य करतो. हा खेळणी विक्रेता आपल्या खेळण्यांची किंमत फिक्स सांगतो त्यात लोकांच्या सांगण्यावरून किंमतीत काही घासाघिस करीत नाही.

व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते की हा विक्रेता आपले सामान किती कुशलतेने विकतो आहे. हा खेळणी विक्रेता ट्रेन मधील एसी कोच मध्ये खेळणी विकत होता तेव्हा त्याचा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे.

लेखक दिव्य प्रकाश दुबे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका व्यक्तीने खेळणे घेतल्यानंतर या विक्रेत्याकडे बॉक्स ची मागणी केली पण या विक्रेत्याने मात्र त्याचे उत्तरही त्याच्या खास शैलीत दिले ” अरे बिना डब्बे का कैसे लें?… अरे वैसे ही जैसे फकीर आदमी झोला उठाकर चल देता है.” असे उत्तर त्या विक्रेत्याने दिले. एवढेच नाही तर या विक्रेत्याने त्याच्याकडे असलेल्या लेडीज पर्सची नावे देखील सोनिया , प्रियंका , सुषमा अशी ठेवली आहेत. आता हा विक्रेता गजाआड झाला आहे.