रेल्वेत पंतप्रधान मोदींची ‘मिमिक्री’ करणाऱ्याने जेलमध्ये नारायण साईची ‘अशी’ उडवली ‘खिल्ली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेत अवैधरित्या खेळणी विक्री करताना राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची मिमिक्री करणाऱ्या अवधेश दुबे याला सोमवारी कोर्टाकडून जमीन मिळाला. यानंतर त्याने एका खाजगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कोठडीत आलेले अनुभव सांगितले. यावेळी या संवादात दुबेने सांगितले की सूरत तुरुंगात बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेला नारायण साई आणि कटप्पा सारख्या दिसणाऱ्या माणसाची आतमध्ये भेट झाली. यावेळी त्यांच्याशी देखील त्याने मस्ती केली.

ज्यावेळी अवधेश नारायण साईंना भेटला त्यावेळी त्याने त्यांचे दर्शन घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी बोलताना तो म्हणाला कि, मी आतमध्ये तुम्हाला भेटायला आलो आहे, तुम्हाला बाहेर काढायचे आहे. यावर नारायण साईंनी त्याला उत्तर देताना म्हटले कि, बाहेर जा माझ्यासाठी आंदोलन करा.

त्याचबरोबर मला सोडवण्यासाठी मीडियाची मदत घ्या. त्यानंतर त्याने नारायण साईंना तुमच्याकडे खूप सोने, चांदीचे दागिने आहेत तर तुम्ही मला सांगा ते कुठे लपवून ठेवले आहेत, जे मी खोदून काढेल धमाल फिल्म सारखं ? असे त्याने विचारले असता, यावर नारायण साई म्हणाले कि, माझ्याकड़े यातील काहीही नाही, मी तर संत फकीर आहे. त्यावर साईंना उत्तर देताना त्याने म्हटले कि फकीर तर आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. काहीही न घेता ते आपल्या देशाची सेवा करत आहेत.

त्याचबरोबर कटप्पा सारखी वेशभूषा आणि दाढी असलेल्या एका आरोपीशी देखील त्याची भेट झाली. यावेळी त्याने त्याच्याशी देखील मस्ती केली. यावेळी त्याने त्याला चिडवत म्हटले कि, कटप्पा तुम्हाला बाहुबलीच्या खुनाच्या केसमधून राजमाताने अजून बाहेर काढले नाही का? यावर त्या आरोपीने सांगितले कि तो खरंच खुनाच्या गुन्ह्यात आतमध्ये आलेला आहे.

दरम्यान, शुक्रवारी रेल्वेत अवैधरित्या खेळणी विक्री करताना राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची मिमिक्री करताना अवधेश दुबे याला अटक करण्यात आली होती. त्याचा ६ मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वेत अवैधरित्या खेळणी विक्री केल्याप्रकरणी अटक केली होती.

You might also like