TP Scheme Property Card Pune | म्हाळुंगे- माण टीपीस्किम मधील शेतकर्‍यांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – TP Scheme Property Card Pune | पीएमआरडीएच्यावतीने (PMRDA) म्हाळुंगे, माण टीपी स्किम योजनेतील (Mahalunge, in Maan TP Scheme Scheme) शेतकर्‍यांंचे प्रॉपर्टी कार्ड (Property Card) वाटप सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १५० प्रॉपर्टी कार्डचे चावडी वाचन करून कच्चे प्रॉपर्टी कार्ड शेतकर्‍यांंना देण्यात आले आहे. नागरिकांनी प्रॉपर्टी कार्डची तपासणी करून काही चुका असल्यास पुढील आठ दिवसांत पीएमआरडीएला कळवावे, असे आवाहन पीएमआरडीएच्यावतीने करण्यात आले आहे.

 

म्हाळुंगे माण टीपीस्किम मधील शेतकर्‍यांचे भूखंड निश्‍चित करण्यात आले आहेत. येथील शेतकर्‍यांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचे प्रॉपर्टी कार्डही तयार करण्यात आले आहेत. (TP Scheme Property Card Pune )

 

पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे (PMRDA Commissioner Suhas Divase) यांच्या आदेशानुसार आज पहिल्या टप्प्यात १५० शेतकर्‍यांच्या प्रॉपर्टी कार्डचे चावडी वाचन करण्यात आले.
प्रॉपर्टी कार्डच्या कच्च्या प्रति संबधित शेतकर्‍यांना देण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये काही चुका आढळल्यास अथवा काही दुरूस्ती करायची असल्यास शेतकर्‍यांनी पुढील आठ दिवसांत पीएमआरडीए अथवा भूमी अभिलेख विभागास कळवावे,
असे आवाहन पीएमआरडीएचे विशष कार्य अधिकारी रामदास जगताप (Ramdas Jagtap, Special Operations Officer, PMRDA) यांनी यावेळी केले.

 

 

Web Title :- TP Scheme Property Card Pune | Distribution of property cards to farmers in Mahalunge Maan TP scheme

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा