TRA Brand Trust Report | Dell बनला भारताचा सर्वात विश्वसनीय ब्रँड, टॉप 5 मध्ये कोणताही भारतीय ब्रँड नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – TRA Brand Trust Report | अनेकदा असे दिसून येते की जेव्हाही आपण भारतीय वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा भारतीय ब्रँडपेक्षा परदेशी ब्रँडला जास्त महत्त्व देतो. टीआरएच्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट 2022 मध्ये असेच काहीसे दिसून आले आहे, ज्यात भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडची यादी दिली आहे. (TRA Brand Trust Report)

 

टीआरएच्या वार्षिक रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी डेल (Dell) सलग तिसर्‍या वर्षी भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे तर या यादीतील पहिल्या 10 मध्ये फक्त दोन भारतीय ब्रँडच्या नावांचा समावेश आहे.

 

LIC देशातील 6 वा विश्वासार्ह ब्रँड :
टॉप 10 ब्रँड्सपैकी 8 परदेशी आणि दोन भारतीय ब्रँडने स्थान मिळवले आहे. एलआयसी हा देशातील सहावा सर्वात विश्वासार्ह ब्रँड ठरला आहे. तर टाटा समूहाचा ब्रँड टायटन आठव्या स्थानावर आहे. (TRA Brand Trust Report)

 

टीआरए यादीनुसार देशातील टॉप 10 ब्रँड्स :

1. डेल (Dell) पहिल्या क्रमांकावर

2. एमआय (MI) दुसर्‍या क्रमांकावर

3. सॅमसंग मोबाइल (Samsung Mobiles) तिसर्‍या क्रमांकावर

4. एलजी टेलिव्हिजन (LG Television) चौथ्या क्रमांकावर

5. अ‍ॅमेझॉन (Amazon) वर पाचव्या क्रमांकावर

6. एलआयसी (LIC) सहाव्या क्रमांकावर

7. बीएमडब्ल्यू (BMW) सातव्या क्रमांकावर

8. टायटन (Titan) आठव्या क्रमांकावर

9. लेनोवो (Lenovo) आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स (Samsung Electronics) नवव्या क्रमांकावर

 

सर्वात जास्त टाटा (TATA) वर विश्वास :
टीआरए रिसर्चचे सीईओ एन चंद्रमौली यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षाच्या रिपोर्टमध्ये काही समूह ब्रँडने लक्षणीय नफा मिळवला आहे. या यादीत टाटा समूहाचे सर्वाधिक 36 ब्रँड आहेत, त्यानंतर गोदरेज समूहाचे 9 आहेत, तर अमूल, एलजी, सॅमसंग, एम अँड एम आणि सॅमसंगचे प्रत्येकी आठ ब्रँड आणि मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सात ब्रँड या यादीत आहेत.

 

या ब्रँडवरील विश्वास झाला कमी :

भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडच्या यादीत सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (हिंदी) चार स्थानांनी घसरून 11 व्या क्रमांकावर.

सॅमसंग टेलिव्हिजन सात स्थानांनी घसरून 16 व्या क्रमांकावर.

चिनी मोबाईल कंपनी विवो आठ स्थानांनी घसरून 18 व्या क्रमांकावर.

एलजी रेफ्रिजरेटर्स पाच स्थानांनी घसरून 19 व्या क्रमांकावर

मारुती सुझुकी बारा स्थानांनी घसरून 20 व्या क्रमांकावर.

 

Web Title :- TRA Brand Trust Report | tra brand trust report dell becomes india most trusted brand

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा