२ विद्यार्थ्यांना चिरडल्याने जमावाने पेटवला ट्रॅक्टर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने रिक्षाला दिलेल्या धडकेत दोन शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणे सात वाजता यावल तालुक्यातील आडगाव येथे घडली. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रॅक्टर पेटवून दिला. तसेच एका पोलिसाला मारहाण करण्यात आली.

कर्जत – आपटा एसटी बसमध्ये बॉम्ब आढळल्याने खळबळ 

अपघातात मृत्यु पावलेले दोन्ही विद्यार्थी इयत्ता नववीचे असून सकाळी शाळेत जात होते. या घटनेत दोन्ही मुलांचा चेंदामेंदा झाला असून रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. यावेळी परिसरातील नागरिक धावून आले व संतप्त झालेल्यांनी ट्रॅक्टर चालक तसेच इथे आलेल्या पोलिसाला देखील मारहाण केली.
ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक केली जात होती. वाळू वाहतूक बंद असतानाही अवैधरित्या तालुक्यात वाळू वाहतूक होत असल्याने नागरिक संतप्त झाले व त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला. त्यात ट्रॅक्टर संपूर्ण जळून खाक झाला.