दिल्लीतील 4 शेतकरी आंदोलनातील नेत्यांना उडविण्याचा कट; पोलीस अधिकाऱ्यानेच सुपारी दिल्याचा संशयिताचा दावा

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलकांकडून ( farmer leader) २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली काढली गेली तर मंचावरील ४ शेतकरी नेत्यांना ( farmer leader ) गोळ्या घालून ठार करण्याची सुपारी मिळाली असल्याचा दावा एका संशयिताने केला आहे. सिंघु बॉर्डरवरील आंदोलक शेतकर्‍यांनी या संशयिताला मिडियासमोर हजर करुन त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हा तरुण सोनपत येथील राहणारा असून तो ९ वी नापास आहे. त्याने सांगितले की, आपल्याला १९ जानेवारीपासून सिंघु बॉर्डरवर रेकी करण्यासाठी सांगितले गेले. त्यासाठी येथील पोलीस ठाण्याच्यातील पोलीस अधिकार्‍याने सुपारी दिली आहे. आपल्याप्रमाणे आणखी काही जण काम करत आहेत. शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर रॅली काढली तर त्यांच्यातील ४ शेतकरी नेत्यांना ठार मारण्याची सुपारी दिली असल्याचे या संशयित तरुणाने सांगितले आहे.

ट्रॅक्टर रॅलीमधील शेतकरी दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न केला तर दिल्ली पोलीस त्यांना अडविणार. त्यानंतर आम्ही मागाहून फायरिंग करणार, जसे पोलिसांना वाटेल की शेतकर्‍यांकडून गोळीबार करण्यात आले. रॅलीमध्ये काही लोक पोलिसांच्या गणवेशात सहभागी होणार आहेत. त्याद्वारे गोंधळ झाल्यास शेतकर्‍यांना पळवून लावले जाणार असल्याचा प्लॅन आहे.