Petrol Diesel Prices : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग 8 च्या दिवशी वाढ, जाणून घ्या प्रमुख शहरातील आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे सत्र रविवारीही लागोपाठ आठव्या दिवशी सुरूच होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर पेट्रोलचे दर आकाशाला भिडले आहेत. येथे पेट्रोल आता 60 पैशांनी वाढून 82.70 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. अशाप्रकारे डिझेलसुद्धा 61 पैसे वाढून 72.64 रुपये प्रति लीटर झाले आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई            82.70 – 72.64
पुणे              83.06 – 71.91
ठाणे            82.48 – 71.32
अहमदनगर  82.82 – 71.68
औरंगाबाद   82.94 – 71.80
धुळे            82.57 – 71.46
कोल्हापूर    82.91 – 71.79
नाशिक       83.09 – 71.94
रायगड       82.41 – 71.27

लॉकडाऊननंतर पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली आहे. सरकारने मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्यूटी प्रति लीटर 3 रुपये वाढवली होती. इंधन कंपन्यांनी त्यावेळी किमतीमध्ये वाढ केली नव्हती, यामुळे आता रोज दर वाढत आहेत. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अ‍ॅनालिसिस सेलच्या आकड्यांनुसार मे महिन्यात इंधनाची मागणी एप्रिल महिन्याच्या तुलनेत 47.4 टक्के जास्त होती. मागच्या वर्षीच्या मे महिन्याची तुलना केली तर ती 23.3 टक्के कमी होती.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता