8 जानेवारीला होणाऱ्या ‘देशव्यापी’ संपात 25 कोटी लोक ‘सामील’ होणार, विविध कामगार संघटनांचा ‘दावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे देशातील मुख्य दहा कामगार संघटनांनी 8 जानेवारीला राष्ट्रव्यापी संपाचे आव्हान केले आहे. कामगार संघटनांनी सांगितल्या नुसार या संपामध्ये 25 कोटी लोक सामील होणार आहेत. गेल्या वर्षी देशातील अनेक मोठ्या संघटनांनी 2020 मध्ये मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलेला होता.

दहा केंद्रीय कामगार संघटनांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की 8 जानेवारी रोजी होणार्‍या सर्वसाधारण संपामध्ये किमान 25 कोटी लोकांच्या सहभागाची अपेक्षा आहे. त्यानंतर आम्ही आणखी बरीच पावले उचलू आणि कामगार-विरोधी, लोकविरोधी, देशद्रोही धोरणे मागे घेण्याची सरकारकडे मागणी करू. निवेदनात म्हटले आहे की कामगार मंत्रालय आतापर्यंत कामगारांना मागण्यांचे कोणतेही आश्वासन देण्यात अपयशी ठरले आहे. कामगार मंत्रालयाने 2 जानेवारी 2020 रोजी बैठक बोलावली होती.

निवेदनात म्हटले आहे की 60 विद्यार्थ्यांच्या संघटना आणि विद्यापीठाच्या काही अधिकाऱ्यांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव फी आणि शिक्षणाचे व्यापारीकरण हा त्यांचा अजेंडा आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार आणि इतर विद्यापीठांच्या परिसरांवरील अशाच प्रकारच्या घटनांवर कामगार संघटनांनी टीका केली आहे आणि देशभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांना पाठिंबा जाहीर केला आहे. जुलै 2015 पासून एकाही भारतीय कामगार परिषदेचे आयोजन केले गेले नाही याबद्दल संघटनांनी नाराजी व्यक्त केली. या व्यतिरिक्त कामगार कायद्यांची संहिता तयार करणे आणि सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण करण्यासही संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/