चीननं आपलं अरबो कोटींचं नुकसान केलं, चायनातील अमेरिकी कंपन्या बंद करण्याचा ट्रम्प यांचा आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनमध्ये व्यापार युद्धावरुन रान पेटण्याची शक्यता आहे. कारण चीनने अमेरिकेच्या 5.4 लाख कोटी रुपयांच्या मालावर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने डोनाल्ड ट्रम्प चीनवर भलतेच नाराज झाले आहे. यानंतर ट्रम्प यांनी काही तासाच अमेरिकी कंपन्याना चीनमधील उद्योग बंद करण्याचे आदेश दिलेत.

ट्रम्प यांनी या संबंधित ट्विट केले की, आपल्या देशाने चीन बरोबर उद्योगधंदा करुन अरबो डॉलरवर पाणी फेरले आहे. चीन आपली बौद्धिक संपदा चोरुन वर्षाला अरबो डॉलर कमावत आहे आणि त्यांना तेच हवे आहे. परंतू आता आम्ही असे होऊ देणार नाही. आता आम्हाला चीनची गरज नाही. सत्य तर हे आहे की त्यांच्या शिवाय आपण चांगल्या परिस्थितीत राहू.

ट्रम्प यांच्या या अहवानानंतर अमेरिकी शेअर बाजार चार तासात 3 टक्क्यांने कोसळला.

ट्रम्प म्हणाले, मी मोठमोठ्या अमेरिकी कंपन्याना आदेश देत आहे की, त्यांनी आपला उद्योग परत देशात आणावा. ते लवकरच चीन शिवाय दुसरा पर्याय शोधतील. अमेरिकेसाठी ही मोठी संधी आहे. ट्रम्प यांनी यासह फेडएक्स, अमेझॉन, यूपीएसला देखील चीनमधून येणारी फेंटानिल औषध डिलीवरी बंद करण्याचे आदेश दिलेत. या औषधामुळे दर वर्षी 1 लाख अमेरिकन लोकांचा मुत्यू होतो.

आरोग्यविषयक वृत्त