पाथरी : सोनपेठ रस्त्यावर कार आडवून व्यापाऱ्याला लुटले

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन –  सोनपेठ येथे व्यवसाय उरकुन पाथरीकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यास लिंबा-डाकूपिंपरी दरम्यान आडवून लूटत मारहाण करत गाडी फोडण्याचा प्रकार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत अधिक माहीती अशी की, पाथरी येथून किराणा दुकानासाठी माल पोहचवण्याचा व्यवसाय करणारे शेख जमील शेख इसमाईल यांनी सोनपेठ येथे किराणा दुकानासाठी माल पोहचवुन आपल्या ओमनी कारने पाथरीकडे जात असतांना २० ऑक्टोंबर रोजी रात्री १०ः३० च्या सुमारास रस्त्यावर दगड टाकुन आडवून तीन अज्ञात चोरट्यांनी शेख यांना मारहाण करत त्यांच्याकडील पन्नास हजार रूपये लूटत त्यांची पैशाचीबॕग व एम आय कंपनीचा मोबाईल फोन नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीसांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

जाहिरात

कायद्याच्या चौकटीत कडकपणा दाखवणाऱ्या पोलिसांनी अशा गुन्हेगारावर वचक मिरवत अशा घटनावर अंकुश निर्माण करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान पाथरी-सोनपेठ रोडवर यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याने वाटसरू प्रवाशांना त्रास सहन करावा लागलेला आहे. ही घटना घडत असतांना समोरुन रस्त्याने जाणारी मोटारसायकल पाहून चोरट्यांनी पैशाबॕग, मोबाईल घेत शेख यांच्या ओमनी कारवर दगड मारून पोबारा केला आहे. घटनेची फिर्याद शेख जमील शेख इसमाईल यांनी पाथरी पोलिसात दिली असून तीन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहीती मिळताच डीवायएसपी सेलु, श् वान पथक परभणी, पाथरी पोलीस घटना स्थळी पोहचुन पूढील तपास करीत होते.