५ हजार कोटी घेऊन गुजरातचा व्यापारी परदेशात फरार

नवी दिल्ली : वृत्तसंस्ठा

हिरा व्यापारी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पळालेले असतानाच ५ हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी नितीन संदेसरा परदेशात फरार झाला आहेत. पाच हजार कोटींचा घोटाळा प्रकरणी स्टर्लिंग बायोटेकचा मालक नितीन संदेसरा  भाऊ चेतन, वहिनी दिप्तीबेन आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत नायजेरियाला पळून गेल्याची माहिती सीबीआय आणि ईडीच्या सुत्रांकडून समोर आली आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नितीन संदेसरा याला दुबईत ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आलं होतं. मात्र ही चुकीची माहिती आहे. त्याला कधीही दुबईत ताब्यात घेण्यात आलं नाही. तो आणि त्याचं कुटुंब त्याआधीच नायजेरियाला गेलं असल्याची शक्यता आहे’.

दरम्यान, तपास यंत्रणा दुबई प्रशासनाला विनंती पाठवणार असून तिथे नितीन संदेसरा यांची उपस्थिती आढळल्यास अटक करण्यास सांगणार आहे. याशिवाय संदेसरा कुटुंबाविरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचाही प्रयत्न आहे. संदेसरा कुटुंबाने नायजेरियाला जाण्यासाठी भारतीय पासपोर्टचा वापर केला का यासंबंधी अधिकृत माहिती मिळालेली नाही.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6e5a3515-bfc8-11e8-bb16-570d1951df75′]
सीबीआय आणि ईडीने वडोदरा येथील स्टार्लिंग बायोटेकचे संचालक नितीन, चेतन आणि दिप्ती संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दिक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाऊंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेचे माजी संचालक अनुप गर्ग आणि काही अज्ञातांविरोधात बँकांची पाच हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

‘टेंडर पोस्टिंग’वरील अधिकारी ‘गॅस’वर

[amazon_link asins=’B01FXJI1OY,B07GB9Z17Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f204a68f-bfca-11e8-b3d7-ed3a8e1d5f0a’]