उद्या व्यापाऱ्यांचा भारत बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

किरकोळ व्यापारात परदेशी गुंतवणुकीविरोध शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये राज्यातील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच औषधांच्या ऑनलाइन विक्रिच्या निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टसने २८ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या बंदची हाक दिली आहे. या बंददरम्यान व्यापारी संघटना मोर्चा काढून स्थानिक प्रशासनास आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’641bcb2b-c208-11e8-957c-4565c9ef2717′]

देशातील व्यापारात परकीय गुंतवणुकीला केंद्र सरकारने मोकळीक दिली आहे. यामुळे वॉलमार्ट, फ्लिपकार्टसारख्या मोठ्या कंपन्या किरकोळ बाजारात उतरणार आहेत. यामुळे देशातील व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याचा धोका व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने परदेशी गुंतवणुकीचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी देशभरातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने शुक्रवारी भारत बंदची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व व्यापारी संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे. राज्यातील ८ लाख व्यापारी बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवारी दिवसभर व्यापार आणि दुकाने बंद ठेवून सरकारच्या धोरणांचा निषेध केला जाणार आहेत. जिल्हा, शहर, तालुका पातळीवरील व्यापारी आसपासच्या गावांमधील व्यापाऱ्यांसह तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. सरकारने परदेशी गुंतवणुकीचा निर्णय मागे घ्यावा, ई-कॉमर्सचे धोरण जाहीर करावे, जीएसटीमधील दंडाची तरतूद रद्द करावी, प्राप्तीकराची सवलत वाढवावी, व्यापाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळावे, आदी मागण्या केल्या जाणार आहेत.

[amazon_link asins=’1273516974′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1f265b2-c208-11e8-8a1d-cb4e850e3644′]

ऑनलाइन औषध विक्रिविरोधात औषध दुकानदारही रस्त्यावर उतरले असून त्यांनीही शुक्रवारी बंदचा निर्णय घेतला आहे. बंद दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपत्कालीन सेवा उपलब्ध राहणार आहेत. ऑनलाईन कंपन्या कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही जबाबदारीशिवाय काम करत आहेत. औषधांचे सत्यापन केल्याशिवाय ऑर्डर मंजूर केले जाते. एमटीपी किट्स, सिल्डेनाफिल, टॉडलफील, कोडेन सारखी गुंगी आणणारी औषधे डॉक्टरांचा सल्ला न घेता विकण्यात येत आहेत, असे ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅड ड्रगिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले. जुन्या किंवा बनावटी प्रिस्क्रिप्शनवरून औषधांची विक्री, प्रति औषध कमिशन मिळण्यासाठी रुग्णांची तपासणी न करताच बनावटी ई-प्रिस्क्रिप्शन निर्माण केल्या जात आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यासह परवाना प्राप्त औषधी विक्रेत्यांच्या व्यवसायावर पडत आहे.

‘त्या’ १९ वर्षीय तरुणीचा प्रेम प्रकरणातून गळा आवळून खून

मात्र, शासनाने अद्यापही औषधाची ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तिसऱ्यांदा २८ सप्टेंबरला भारतभर बंदची हाक देण्यात आली आहे.