पूरग्रस्तांसाठी एकवटले मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक ; काही तासात 2 लाखापेक्षा जास्त मदतनिधी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक असो.च्या वतीने कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. बुरुडगाव येथील अंकुर लॉनमध्ये झालेल्या या बैठकित सामाजिक बांधिलकी जपत मंडप, लाईट, जनरेटर, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिकांनी काही तासातच २ लाख ३६ हजार रुपयाचा मदतनिधी जमा केला.

रघुनाथ चौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी चंद्रकांत मेहेत्रे (मेहेत्रे डेकोरेटर्स), समीर शेख (भैय्या), हुसेन शेख, बबन म्हस्के, बहादूर रसुल अत्तार, योगेश मुथा, तात्या काशिद, बाळा लघे, सौरभ तरटे, अमोल जाधव, पोपट राऊत, सोमनाथ रोकडे, अमिते शेटे, जाफर बेग आदींसह शहरातील मंडप, लाईट, जनरेटर, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात चंद्रकांत मेहेत्रे यांनी या सामाजिक उपक्रमास संघटनेचे सदस्य असलेल्या सर्व व्यावसायिक बंधूंनी मदतीचा हात पुढे केला असून, काही तासातच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात आला आहे. संपुर्ण जिल्ह्यातील संघटनेचे सदस्य पुरग्रस्तांसाठी मदत देणार असून, त्या दिशेने कार्य चालू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत मेहेत्रे म्हणाले की, एकजुटीने सर्वांचे प्रश्‍न सुटणार आहेत. संघटन असल्यास एकमेकांच्या कठिण समयप्रसंगी त्यांना आधार देता येतो. संघटना ही नावापुरती नसून, हा एक परिवार असल्याची भावना व्यक्त करीत सामाजिक बांधिलकीने पुरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यात येत असल्याचे सांगितले. तर जिल्ह्यातून चार ते पाच लाख रुपयाची मदत जमा होणार असून, या पैश्यातून पुरग्रस्तांसाठी सोलापुरी चादर व दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तू पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सांगली, कोल्हापूर मधील जलप्रलयात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले. आभार पोपट राऊत यांनी मानले.

आरोग्यविषयक वृत्त –