पारंपारिक मंगलवाद्यांना गणेशोत्सावकाळात ‘अच्छे दिन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोणतीही कला कलाकाराला आणि पाहणाऱ्याला  देखील एक आत्मिक आनंद देऊन जाते. सूर, ताल आणि लय एकूणच संगीत मनाला शांतता मिळवून देते. भारतीय  संस्कृतीतील पारंपारिक वाद्य संगीताला अपूर्व महत्व आहे. यातच मंगल वाद्य म्हणजेच सनई, चोघडे यांची बात काही औरच… पण सध्याच्या रेकॉर्ड आणि डीजेइंगच्या काळात पारंपारिक वाद्य संगीत आता मागे पडत चाललंय …पण खास गणेशोत्सव काळात या पारंपारिक वाद्यांना पुन्हा झळाळी मिळते.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’48c26aa7-b5bc-11e8-a176-d38e0fd5bb40′]

पूर्वीच्या काळी लग्न सराई, मुंज, पारंपारिक सण समारंभात एवढेच काय तर ताबूत विसर्जनादरम्यान देखील मंगल वाद्यांचे वादन  केले जायचे. त्यावेळचे लोक देखील तितकेच मंत्रमुग्ध होऊन हे वादन ऐकायचे. पुण्यात महादेव तुपे यांची आता चौथी पिढी सनई चौघड्यांचे वादन करते. महादेव तुपे यांचे मामा मुरलीधर सोनावणे हे त्याचे गुरु. महादेव तुपे यांचे आजोबा पणजोबा वडील आणि आता महादेव तुपे, त्यांचे सुपुत्र प्रवीण तुपे, महादेव तुपे यांचे भाऊ उदय तुपे देखील सनई चौघडा वादन करतात. त्यांनी हा व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे.
आता तो जमाना नाही राहिला …

पूर्वीच्या काळी पहाटे जवळपास चार  पाच वाजल्यापासून आम्ही सनई चौघडे वाजवण्याकरिता जायचो. लोक देखील चांगला प्रतिसाद द्यायचे. गणेशोत्सव काळात तर खूप मागणी असायची. पण आता या पारंपारिक वाद्यांची जागा रेकॉर्डेड गोष्टींनी घेतली आहे.  जवळपास १० -१० तास हे वादन चालायचे त्यात एक वेगळाच आनंद मिळायचा असे महादेव काका आनंदाने सांगतात. मानाच्या  पाच गणपतींपैकी मानाचा  कसबा गणपती, संजीवनी मित्र मंडळ तसेच बडाई समाज मंदिर येथे त्यांचे सनईवादन आजही ऐकायला मिळेल.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’59f3f811-b5bc-11e8-8e1f-79b09af29421′]

मुळात सनई चौघडे हे वाद्य तसे नवशिख्या माणसाला शिकायला अगदी जड आहे असे हे वाद्य आहे. तसेच चौघडे हे चामड्याचे बनलेले असायचे त्यामुळे यांना दर तासाला कोळशावर गरम करायला  लागायचे तेव्हाच त्याच्यातून अफलातून ध्वनी  उमटायचा. मात्र सध्या या वाद्यांना ऍक्रॅलिक चे मटेरीयल लावले जाते. त्यामुळे आता ही वाद्य तापवावे लागत नाही मात्र चामड्याच्या आवाजातून उमटणाऱ्या ध्वनीला तोड नाही अशी  प्रतिक्रिया महादेव तुपे यांचे भाऊ उदय तुपे यांनी  पोलिसनामा शी बोलताना दिली.
नव्या पिढीने पारंपारिक  कला जपण्याची गरज

 सध्याच्या तरुणाईने या पारंपारीक कला जपण्याची गरज आहे. सध्याची पिढी या पारंपारिक कला यांच्याकडे पाठ फिरवताना दिसतो आहे. ज्या घराण्यांकडे ही परंपरा आहे त्यांच्याकडेच केवळ या कलेबाबत आस्था दिसून येते मात्र, इतर तरुण याकडे येताना दिसत नाहीत अशी खंत महादेव तुपे यांचे पुत्र प्रवीण तुपे यांनी  व्यक्त केली. जर ही परंपरा जपली गेली नाही तर ती लोप पावेल अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. प्रवीण तुपे आपल्या चार वर्षाच्या मुलाला देखील सनईवादनाचे धडे देतात. ही वादनाची परंपरा चालू ठेवण्याचा त्यांचा ध्यास आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पोलीसनामा न्युज
ब्रेकिंग न्यूज तसेच राज्यातील आणि देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा… आणि मिळवा पोलीसनामा च्या प्रत्येक बातमीची लिंक
https://t.me/policenamanews