पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान होणार आहे. जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी (दि.५) प्रस्थान होणार आहे. तर संत ज्ञनेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि.६) प्रस्थान होणार आहे. या दोन्ही पालख्य़ांचे पुणे शहरात शनिवारी (7 जुलै) आगमन होणार आहे. या पालख्या दोन दिवस (9 जुलै पर्यंत) शहरात मुक्कामी राहणार आहेत. या दोन दिवशी शहरात वारक-यांसह भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

दरम्यानच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच वारकरी आणि भाविकांना त्याचप्रमाणे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये या कारणास्तव पुणे शहर वाहतूक शाखेने शहरातील वाहतुकीत बदल केले आहेत. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवा देणा-या वाहनाव्यतिरीक्त शहराबाहेर ये-जा करणा-या वाहन चालकांनी खालील मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.

[amazon_link asins=’B01F8Z47QY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3477817f-7e0a-11e8-a6ad-fd07a012563b’]

मुंबईकडून सोलापूरकडे ये-जा करणा-या वाहनांसाठी
१) तळेगाव येथून इंदुरी, चाकण, शिक्रापूर, वाघोली, केसनंद, थेऊर मार्गे सोलापूर रोडने ये-जा करावी
२) देहुरोड फाट्याने देहुरोड-कात्रज बायपासने कात्रज जकातनाका सातारा रोडने कापुरहोळ मार्गे नारायणपुर, सासवड बाहेरून नारायण फाट्यावरून जेजुरी, मोरगाव, सुपा, चौफुला मार्गे सोलापूरकडे ये-जा करावी

मुंबईकडून अहमदनगरकडे ये-जा करणा-या वाहनांनी
तळेगाव येथून इंदुरी, चाकण, शिक्रापूर, वाघोली मार्गे अहमदनगरकडे जावे

सोलापूरकडून नगरकडे व नगर दिशेने ये-जा करणा-या वाहनांनी
सोलापूर रोडकडून पुण्याकडे येणा-या वाहनांनी व सोलापूरकडे जाणा-या सर्व वाहनांनी चौफुला येथून केडगाव, पारगाव, न्हावरे फाटा, नगररोड मार्गे पुण्याकडे यावे व उलट मार्गे सोलापुरला जावे

साताराकडून सोलापूर व अहमदनगरकडे ये-जा करणा-या वाहनांनी
१) सोलापूर दिशेकडे जाण्यासाठी – कापुरहोळ मार्गे नारायणपूर, सासवड बाहेरून नारायणपूर फाट्यावरून जेजुरी, मोरगाव, सुपा, चौफुला मार्गे सोलापूरकडे ये-जा करावी
२) अहमनगरकडे जाण्यासाठी – कापुरहोळ मार्गे नारायणपूर सासवड बाहेरून नारायणपूर फाट्यावरून जेजुरी, मोरगाव, सुपा, चौफुला मार्गे सरळ केडगाव, पारगाव, न्हावरे गाव फाटा अहमदनगर रोडकडे ये-जा करावी.

[amazon_link asins=’B0188QSY6O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4468ee10-7e0a-11e8-aa51-df7498e819d9′]

पुण्याहून सासवडकडे जाणा-या वाहनांनी
१) कात्रज सातारा रोडने कापुरहोळ, नारायणपूर मार्गे ये-जा करावी.
२) तसेच गोळीबार मैदान व मम्मादेवी चौकातून कोंढवा रोडने सरळ लुल्लानगर, कोंढवा, बोपदेव घाट, सासवड बाहेरील नारायणपूर फाट्यावरून भिवरी, चांबळी या मार्गाचा वापर करावा.

शिवाय दोन्ही पालख्या पुणे शहर हद्दीबाहेर जाईपर्यंत पुणेकरांनी त्यांची वाहने न आणता त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहान पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. यासंबंधी नागरिकांना काही अडचणी असल्यास त्यांनी वाहतूक शाखेच्या 26122000 अथवा 26208225 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.