रुळाला तडे गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ‘विस्कळीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माटुंगा माहिम दरम्यान धिम्या गतीने जाणाऱ्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याचे शनिवारी सकाळी लक्षात आले. त्यामुळे सकाळी सकाळी अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.

शुक्रवारी सकाळी मध्य रेल्वेच्या मार्गावर रुळाला तडे गेल्याने त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. चर्चगेटकडे जाणाऱ्या या लोकल रद्द झाल्याने पश्चिम रेल्वेवरील अनेक स्थानकावर सकाळपासून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. अनेक गाड्या या फास्ट ट्रकवर वळविण्यात आल्याने त्या माटुंगा, प्रभादेवी, महालक्ष्मी या स्थानकावर थांबणार नाहीत.

त्यामुळे या स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. रेल्वेने तडा गेलेला रुळाचा भाग बदलण्यास सुरुवात केली असून काही वेळातच ते काम पूर्ण होईल. मात्र, त्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/