Traffic Jam In Pune Due To Heavy Rain | शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरभर वाहतुकीचा खेळ खंडोबा; 60 ठिकाणी झाडपडी

पुणे : Traffic Jam In Pune Due To Heavy Rain | शहरात मुसळधार पावसामुळे शुक्रवारी संध्याकाळी वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला होता. विविध चौकात ना ट्राफिक कर्मचारी ना सिग्नल, त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडली. शहरात बहुतांश रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Traffic Jam In Pune Due To Heavy Rain)

तब्बल तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साठल्याने वाहतूक विस्कळीत झाली.  अनेक चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. झाडे कोसळल्यामुळे रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले. त्यामुळे प्रमुख रस्त्यांलगच्या गल्ली-बोळातून वाहनचालकांनी वाट काढली. शाळा आणि कार्यालये सुटण्याच्या वेळी झालेल्या पावसामुळे नोकरदार तसेच विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, टिळक रस्ता, सातारा रस्ता, शंकरशेठ रस्ता, ससून रस्ता, नगर रस्ता, बंडगार्डन रस्त्यावरील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Traffic Jam In Pune Due To Heavy Rain)

शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीसमोर झाड कोसळल्याने  भागातील वाहतूक विस्कळीत झाली. झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला होता. मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यात साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नव्हता. पावसामुळे मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडली. सायंकाळी साडेसातनंतर शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत झाली.

पावसामुळे ६० ठिकाणी झाडे पडली

मुसळधार पावसामुळे ६० ठिकाणी झाडे पडली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली.
डेक्कन जिमखाना भागातील बीएमसीसी रस्ता, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर न्यायालयाचे आवार तसेच प्रादेशिक
परिवहन कार्यालयासमोर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. विधी महाविद्यालय रस्ता, वाकडेवाडी, सहकारनगर,
धनकवडी, कात्रज, बिबवेवाडी, मुंढवा, कोंढवा, हडपसर, मांजरी, येरवडा, लोहगाव, पद्मावती, पाषाण, बाणेर, ओैंध,
बालेवाडी, सिंहगड रस्त्यासह साठ ठिकाणी झाडे पडल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे पडल्याच्या घटनांची माहिती नागरिकांनी दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
झाडे पडण्याच्या घटनांमुळे वाहतूक विस्कळीत झाली. झाडांच्या फांद्या हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Web Title :- Traffic Jam In Pune Due To Heavy Rain | Heavy rain on Friday night disrupted traffic across the city; Trees fell in 60 places

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune CNG Pump | पुण्यातील CNG पंपासंदर्भात नवा खुलासा, केवळ ‘हे’ पंप बंद राहणार

Maharashtra Yuva Sena | शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकारिणीत नेत्यांच्या मुलांचा भरणा, मोदींच्या घराणेशाही विरोधी धोरणास हरताळ