ADV

Traffic Jam In Pune | सर्वंकष विकास नियंत्रण नियमावलीतील घातक तरतुदी सुधाराव्यात अन्यथा शहरात वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधां गंभीर होउन बकालपणा वाढेल

माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Traffic Jam In Pune | राज्य सरकारने २०२० साली लागु केलेल्या सर्वंकष विकास नियंत्रण नियमावलीतील घातक तरतुदी तातडीने सुधाराव्यात अशी मागणी माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम (Nilesh Nikam) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या तरतुदी सुधारल्या नाही तर शहराचा बकालपणा , पार्किंग समस्या , रस्त्यावरील वाहतुक कोंडी आणि नागरी सुविधांचे प्रश्न आणखी गंभीर होतील अशी भिती निकम यांनी व्यक्त केली आहे.


राज्य सरकारने डिसेंबर २०२० साली राज्य सर्वंकष विकास नियंत्रण नियमावली लागू केली आहे. ही पद्धत चुकीची आहे. प्रत्येक शहराची वाढ वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. प्रत्येक शहराची धाटणी, भौगोलिक स्थान, लोकांचे राहणीमान, वाहतूक व्यवस्था, व्यवसाय इत्यादी सर्व काही वेगवेगळे असते. असे असताना सरसकट सर्वच शहरांना एकच विकास नियंत्रण नियमावली लादणे सयुक्तिक वाटत नाही असे निकम यांंनी निवेदनात नमूद केले आहे.

सर्वंकष विकास नियंत्रण नियमावलीत भरमसाठ चटई क्षेत्र निर्देशांक दिल्यामुळे बांधकाम आणि लोकसंख्येत वाढ होईल. लोकसंख्येची घनता अवास्तव वाढेल. बांधकाम परवानगीमध्ये पार्कींगच्या संदर्भातील तरतुदी असुन, त्या अपुर्‍या आहेत, त्यामुळे गृहप्रकल्पांत पार्कींगसाठी पुरेशी जागा ठेवली जात नाही. पर्यायाने वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. तसेच या नियमावलीत एन्सीलरी एफएसआयची तरतुद केली गेली आहे. या एफएसआय चा दर १५ टक्के असल्याने पेड एफएसआयचा वापर कमी होत आहे. एन्सीलरी एफएसआयचा गैरवापर व अवास्तव वापर होत असल्याचे दिसून येते. अशा विविध चुकीच्या तरतुदींचा शहराला भेडसावित असलेल्या नागरी सुविधांचे प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतो. त्यासाठी दूरदृष्टी ठेऊन दीर्घकालीन नियोजन केले पाहिजे अन्यथा पुणेकरांचे अतोनात हाल होतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे निकम यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Talegaon Dabhade Pimpri Crime News | पिंपरी : तळेगाव दाभाडे परिसरातून चार पिस्टल व सहा काडतुसे जप्त, तिघांना अटक

Dheeraj Ghate On Pubs In Pune | पुण्यातून पब संस्कृती हद्दपार करा, नाहीतर रस्त्यावर उतरु – धीरज घाटे (Video)

Pune Crime News | पुणे : मोबाईल चोरीचे कनेक्शन थेट चीनपर्यंत, स्वारगेट पोलिसांची कारवाई

Yerawada Pune Crime News | पुणे : बहिणीला पळून नेल्याच्या कारणावरुन तरुणीच्या भावाकडून ज्येष्ठ नागरिकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून, येरवडा परिसरातील घटना