अपघातातील ट्रकमधील आॅईल सांडल्याने एक्सप्रेसवर वाहनांचा रांगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली गावाच्या हद्दीत बोरघाटातील उतारावर साखरेचा ट्रक उलटला.  यावेळी ट्रकमधील आॅईल रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून उलटल्याने हा अपघात झाला़ यामध्ये कोणी जखमी नसले तरी अपघातानंतर रस्त्यावर आॅईल पसरल्याने वाहने संथगतीने जात होती. यामुळे काही काळ एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग व खोपोली पोलीस तसेच आयआरबी पथक व अपघातग्रस्तांच्या मदतीला आले.  आॅईलवर माती टाकत वाहतूक सुरु केली. अपघातग्रस्त ट्रक बाजुला करत सध्या संथगतीने वाहतूक सुरु आहे.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c1615f87-9f89-11e8-b862-9fe7bd0c2f1b’]