वाहतूक कायद्यातील तरतुदी निष्पापांचा जीव वाचवण्यासाठीच : नितीन गडकरी (व्हिडीओ)

वृत्तसंस्था – केंद्र सरकारने मोटार वाहन दुरुस्ती विधेयक २०१९ मंजूर केल्यानंतर देशभरात त्यावरून विविध चर्चा सुरु आहेत. काही लोकांना नवीन तरतुदी अतिशय जाचक वाटत आहेत. तर काही लोकांना यातील तरतुदी म्हणजे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना चांगला चाप बसेल असे वाटत आहे.

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक व्हिडीओ ट्विटर वर व्हायरल केला आहे. ज्यात ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असल्याचे दिसत आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, देशात वर्षाला ५ लाख अपघात होतात त्यात तब्बल दीड लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यामध्ये १८-३५ वयोगटातील प्रमाण हे ६५ टक्के आहे. यांचा जीव वाचवायला नको का..? असा प्रश्न गडकरी यांनी यावेळी विचारला. कायद्यांच्या प्रति जर सन्मान आणि भीती नसेल तर हे बरोबर नाही.

आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, सरकारला जास्त दंड आकारण्याची अजिबात इच्छा नाहीये.  नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे जेणेकरून दंड लावण्याची वेळच येऊ नये.

स्कुटी ची किंमत १५ हजार रुपये आणि चलन काटले गेले २३ हजारांचे.

एका स्कुटर चालकाला त्याच्या स्कुटर च्या किमतीपेक्षा जास्त फाईन लावला गेला. त्याच्या स्कुटी ची किंमत केवळ १५ हजार रुपये आणि चलन काटले गेले २३ हजारांचे. यावरून गडकरींना प्रश्न विचारला गेला असताना यावर गडकरी म्हणाले, रिक्षावाला एकतर दारू पिलेला होता आणि त्याच्याकडे लायसन्स आणि कागदपत्रे नव्हते. सर्व दंड मिळून  हा आकडा आला आहे.

सरकारला जास्त दंड आकारण्याची अजिबात इच्छा नाहीये.  नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे जेणेकरून दंड लावण्याची वेळच येऊ नये. मोठं मोठे दंड आकारण्याचे प्रकार उघडकीस येऊ लागल्यानंतर समाज माध्यमांवर विविध चर्चा रंगल्या असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गडकरी यांनी यावर आपले मत व्यक्त केले.