‘चेकिंग’चा व्हिडिओ बनविताना ट्रॅफिक पोलिस तुमच्या मोबाइलला हातही लावू शकत नाहीत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 सप्टेंबरपासून देशभरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याबाबत नवीन नियम लागू झाले आहेत. नवीन नियमानुसार, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास 10 पट अधिक दंड भरावा लागणार आहे. मात्र याचबरोबर आपल्यालाही काही हक्क आहेत. ट्रॅफिक पोलिसांसोबत संभाषणादरम्यान तुम्ही मोबाइलवर व्हिडिओ काढू शकता. तुमचा मोबाइल फोन किंवा कॅमेरा हिसकावून घेण्याचा अधिकार पोलिसांना नाही. एका आरटीआयला उत्तर देताना हरियाणा पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

सुधारित मोटार वाहन कायदा अस्तित्त्वात आला असल्याने चलनचे दर प्रचंड झाले आहेत. ट्रॅफिक पोलिसही पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय दिसत आहेत. अनेक ठिकाणांहून पोलिसांच्या अधिकाराच्या गैरवापराच्या तसेच अरेरावीची बातम्या आणि व्हिडिओसमोर येत आहेत. अशा परिस्थितीत आपलेही काही हक्क आहेत. पोलिसांसोबत संभाषणादरम्यान तुम्ही मोबाइल वापरू शकता. यावर कोणतेही बंधन नाही. तुमचा मोबाइल फोन किंवा कॅमेरा हिसकावून घेण्याचा किंवा तोडण्याचा अधिकार पोलिस कर्मचाऱ्यास नाही.

फरीदाबाद येथील आरटीआय कार्यकर्ते अनुभव सुखीजा यांनी वाहनचालकांच्या हक्कांबाबत हरियाणा पोलिसात आरटीआय अर्ज दाखल केला होता. यावर उत्तर देताना पोलिसांनी सांगितले की, चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) वगैरे नसल्यास तो मोबाइलवर कागदपत्र दाखवू शकतो.
वाहन चालवताना हॉकी, क्रिकेट बॅट, वगैरे वस्तूंवर बंदी नाही. मात्र बेकायदा शस्त्रे बाळगणे हा दंडनीय गुन्हा आहे.

अरेरावी किंवा मारहाण करण्याचा अधिकार नाही
पोलीस कर्मचारी वाहनचालकास हाताने ईशारा करून थांबवू शकतो. मात्र पोलिसांद्वारे दिलेल्या इशाऱ्याकडे वाहन चालकाने दुर्लक्ष केल्यास त्याविरूद्ध योग्य कारवाई करण्याचा पोलीस कर्मचाऱ्याला अधिकार आहे. मात्र पोलीस कर्मचारी कोणत्याही व्यक्तीला मारहाण करू शकत नाही किंवा अरेरावीची भाषा वापरू शकत नाही.

आरोग्यविषयक वृत्त –