वाहतूक कोंडी सोडवायला गेले अन् गमवावा लागला जीव 

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

नवी मुंबईत अज्ञात वाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. अतुल घागरे असे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले होते.

दुर्दैवं म्हणजे मुलीच्या वाढदिवशीच या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. आपल्या मुलीला जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यापूर्वीच वाहतूक पोलिसाला जीव गमवावा लागला. अतुल घागरे हे तळोजा एमआयडीसीमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पहाटे पाचच्या सुमारास गेले होते. यावेळी त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.अतुल घागरे यांच्या पत्नी पोलीस खात्यात असून त्या रबाळे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

१२ वर्षात पुलाचे वाजले १२

[amazon_link asins=’B075JC1RC2,B074RMN99F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be8b704f-b0d2-11e8-b1a1-bd78a26cfd8b’]

तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असते. तसेच अनेकवेळा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते . या भागात रात्रीच्या वेळी फक्त एकच वाहतूक पोलीस कर्मचारी असल्याचं समोर येत आहे. पोलिस कर्मचारी कमी असल्याने पोलीस संख्याबळ वाढवा अशी विनंती कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. मात्र याकडे वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष केल्यानेच अतुल घागरे यांना जीव गमवावा लागला, अशी संतापाची प्रतिक्रिया पोलीस कर्मचाऱ्यांमधून निघत आहे.

उद्या पुणे-मुबंई द्रुतगती मार्ग ४० मिनिटांसाठी बंद असणार