Traffic Police | आता अल्पवयीनांना गाडी चालवताना होणार ‘इतक्या’ रुपयांचा दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Traffic Police | भारतात अनेक गोष्टी करण्याची कायदेशीर परवानगी मिळण्यासाठी आपण एक वयोमर्यादा पार करावी लागते. म्हणजे लग्न करण्यासाठी २१ वर्षांची वयोमर्यादा आहे. मतदानासाठी १८ वर्षांची वयोमर्यादा आहे. तशीच गाडी चालवण्यासाठी एक वयाची अट आहे. कोणीही वयाची १८ वर्षे पूर्ण करण्याआधी वाहन चालवू शकत नाही. हा आता या अटीचे बहुतेक लोक पालन करत नाही ही गोष्ट वेगळी. पण महाराष्ट्र सरकारने यासंबंधी नवे परिपत्रक काढले आहे. परिपत्रकानुसार १६ वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी वाहन चालविताना आढळल्यास, पाच हजार रुपये दंड (Traffic Police) आकारण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना देण्यात येणार आहे.

 

पूर्वी एखादा अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी गाडी चालवताना आढळली, तर १०० दंडाची तरतूद होती. त्यानंतर, हा दंड (Traffic fines) पाचपट वाढवून ५०० रुपये करण्यात आला. तरी, वाहतूक पोलिसांनी पकडल्यास १०० रुपये दंड भरून वाहन चालक व पालक चिंतामुक्त व्हायचे. पण, आता तसे होणार नाही. या नवीन परिपत्रकानुसार जर बाल वाहनचालक सापडला तर त्याला किंवा त्याच्या पालकाला पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मोटर वाहन सुधारणा अधिनियम २०१९ अंतर्गत गृह परिवहन विभाग मुंबईच्या वतीने वाहन चालकांवरील हा नवीन दंड ठरविण्यात आला. (Traffic Police)

असे अल्पवयीन वाहन चालक महाविद्यालयाजवळ जास्त प्रमाणात आढळून येते.
अनेक विद्यार्थी आपल्या वडिलांची दुचाकी घेऊन येतात. तसेच, क्लाससाठी जाण्यासाठीही ते वाहनाचा वापर करतात.
वाहतूक पोलिसांना कळू नये, म्हणून अनेक जण हेल्मेटचा वापर करतात,
तर महाविद्यालयाच्या आवारात हे अल्पवयीन विद्यार्थी ट्रीपल सीट जातानाही दिसून येतात.
आपल्या अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्या पालकांवरही वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करू शकतात,
शिवाय मुलाकडून अपघात झाल्यास, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईसोबत पालकांना तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

 

Web Title :- Traffic Police | if drive the vehicle before 18 year completed a fine of five thousand pune news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलू देत आम्हाला घेणे-देणे नाही; आमचे मुख्यमंत्री तोंड कधी उघडणार?’ – संजय राऊत

Ahmednagar Crime | कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन न केल्याने विद्यार्थ्याची शिक्षिकेला शिवीगाळ

Sulochana Chavan Passed Away | लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास